लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने आयोजित ‘अभिजित रियल्टर्स अॅन्ड इन्फ्राव्हेन्चर्स’ प्रस्तुत व कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्स सहपुरस्कृत, पॉवर्ड बाय ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉन सीझन-२ चा महाकुंभ आज रविवारी (दि.३) कस्तूरचंद पार्कवर भरणार आहे. ‘मी धावतो माझ्यासाठी, हा संदेश देण्यासाठी आयोजित महामॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू धावणार आहेत. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागातील धावपटू नागपुरात डेरेदाखल झाले असून ऐतिहासिक महामॅरेथॉनपर्वासाठी समस्त नागपूरकर देखील सज्ज झाले आहेत.महामॅरेथॉनची प्रतीक्षा संपली असून रविवारी पहाटे ५ वाजेपासून कस्तूरचंद पार्क येथे धावपपटूंचा मेळा भरणार आहे. गेल्या महिनाभरापासून महामॅरेथॉनबद्दल शहरात उत्सुकता असून संपूर्ण शहर मॅरेथॉनमय बनले आहे. सकाळी ६ वाजता अर्ध मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखविण्यात येईल. पाठोपाठ दहा किमी आणि पाच किमी अंतराच्या शर्यती देखील सोडण्यात येणार आहेत. तीन किमी अंतराच्या‘ फॅमिली रन’ला देखील सुरुवात करण्यात येईल. त्याआधी पहाटे ५ पासून मैदानावर धावपटूंसाठी रिलॅक्स झीलतर्फे वॉर्मअपचे आयोजन राहील. नेत्रदीपक सोहळ्याद्वारे महामॅरेथॉनचे उद्घाटन होणार आहे. सर्वच गटातील मॅरेथॉनमध्ये नागपूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून त्यात आंतरराष्ट्रीय धावपटूंसह शहरातील आबालवृद्ध,उद्योजक, अधिकारी वर्ग,संरक्षण दलातील सैनिक आणि हौशी धावपटू महामॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. दरम्यान स्पर्धेसाठी मॅरेथॉन मार्गाचे नीटनेटके आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी मनोरंजनाच्या मेजवानीसह स्वयंसेवक आणि कार्यकर्ते धावपटूंना मार्गदर्शन करतील. धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित राहून टाळ्या, ढोलताशे वाजवून फुले उधळून आणि रांगोळ्या काढून स्वागत करावे, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूरकर आज धावणार :नागपूर महामॅरेथॉनचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:00 AM
लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने आयोजित ‘अभिजित रियल्टर्स अॅन्ड इन्फ्राव्हेन्चर्स’ प्रस्तुत व कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्स सहपुरस्कृत, पॉवर्ड बाय ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉन सीझन-२ चा महाकुंभ आज रविवारी (दि.३) कस्तूरचंद पार्कवर भरणार आहे. ‘मी धावतो माझ्यासाठी, हा संदेश देण्यासाठी आयोजित महामॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू धावणार आहेत. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागातील धावपटू नागपुरात डेरेदाखल झाले असून ऐतिहासिक महामॅरेथॉनपर्वासाठी समस्त नागपूरकर देखील सज्ज झाले आहेत.
ठळक मुद्देराज्यभरातील खेळाडू दाखल