शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

आज ‘मत’परीक्षा

By admin | Published: February 21, 2017 1:52 AM

महापालिका निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

मनपा प्रशासन सज्ज : उपराजधानीत तगडा पोलीस बंदोबस्त नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेच्या १२ झोनमधील ३८ प्रभागातील २७८३ मतदान केंद्रांवर महापालिकेच्या १५१ जागांसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ११३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून २० लाख ९३ हजार ३९२ मतदार त्यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. दोन मतदान कें दे्र पहिल्या माळ्यावरनागपूर शहरातील २७८३ मतदान केंद्रांपैकी दोन मतदान केंद्र पहिल्या माळ्यावर ठेवण्यात आली आहेत. यात उमरेडवरील ताजाबाग माध्यमिक शाळा व उदयनगर येथील सेंट विसेंट हायस्कूलचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी डोलीची व्यवस्था करण्यात आली आहे.अशी आहे मतदान केंद्रांची रचनामहापालिका निवडणुकीसाठी ९६१ इमारतीत २७८३ मतदान केंद्र राहणार आहेत. यात एका इमारतीत ९ मतदान केंद्र आहेत. १५५ इमारतीत प्रत्येकी एक , ३१२ इमारतीत प्रत्येकी दोन मतदान केंद्र, १९७ इमारतीत प्रत्येकी तीन, १५५ इमारतीत प्रत्येकी चार, ८५ इमारतीत प्रत्येकी पाच, ३९ इमारतीत प्रत्येकी सहा, ११ इमारतीत प्रत्येकी सात तर सहा इमारतीत प्रत्येकी ८ मतदान केंद्र आहेत.चार रंगांच्या मतपत्रिकाबहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत मतदान यंत्रावर चार रंगांच्या मतपत्रिका लावण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागातील ‘अ’ जागेसाठी पांढरा रंग, ‘ब’ जागेसाठी फिक्का गुलाबी, ‘क’ जागेसाठी फिक्का पिवळा आणि ‘ड’ जागेसाठी फिक्का निळा रंग वापरला जाणार आहे. प्रभाग १ ते ३७ मधील मतदारांना प्रत्येकी चार उमेदवारांना तर प्रभाग ३८ मधील मतदारांना प्रत्येकी तीन मतदान करावयाचे आहे. एखाद्या उमेदवाराला मतदान करावयाचे नसल्यास नोटाचा वापर करता येणार आहे.प्रभागनिहाय मतदार यादीनागपूर शहरात २० लाख ९३ हजार ३९२ मतदार असून यात १० लाख ७० हजार ९३० पुरुष तर १० लाख २२ हजार ३९९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. नागपूर शहरातील मतदारांची संख्या २०१२ च्या तुलनेत १ लाख ३ हजारांनी वाढलेली आहे. १६ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्तीमहापालिका निवडणुकीसाठी १६ हजार ४९५ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात मतदान कें द्राध्यक्ष, मतदान अधिकारी -१ मतदान अधिकारी-२, मतदान अधिकारी-३ व शिपाई आदींचा यात समावेश आहे.२७९ वाहनांची व्यवस्थामहापालिकेच्या १२ झोनमध्ये २७८३ मतदान केंद्रे आहेत. १६ हजार ४९५ कर्मचारी व अधिकारी या प्रक्रियेत सहभागी आहेत. त्यांची ने-आण करणे, मतदानाचे साहित्य, मतदान केंद्रांवर पोहचवणे यासाठी २७९ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात राज्य परिवहन महामंडळाच्या ६८ बसेस, शहर परिवहन विभागाच्या १०२ स्टार बसेस व ३४ मिनी बसेस तसेच ७५ जीप वाहनांचा यात समावेश आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व भरारी पथकासाठी यापूर्वीच वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.उमेदवारांना दोनच वाहने वापरता येणारनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या दिवशी उमेदवाराला स्वत:साठी व मतदान प्रतिनिधीसाठी अशा दोन वाहनांचा वापर करण्याची मुभा राहणार आहे. त्यापेक्षा अधिक वाहनांचा उमेदवारांना वापर करता येणार नाही. २०० मीटर परिसरात बुथ नाहीमतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात उमेदवारांना कोणत्याही स्वरूपाचा प्रचार करता येणार नाही. या परिसरात उमेदवारांना प्रतिनिधींचा बुथ उभारता येणार नसल्याची माहिती अपर आयुक्त रवींद्र्र कुंभारे यांनी दिली