शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

आजचा दिवस चटके, मग पुन्हा अवकाळीचे सावट

By निशांत वानखेडे | Published: May 04, 2024 9:29 PM

पश्चिम विदर्भात सूर्य तळपला : नागपूर, गोंदियात ताप कमी

नागपूर : मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात उन्हाचे चटके भरपूर तापदायक ठरले आहेत. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात लाेक चांगलेच हाेरपळले. सूर्याचे चटके आणखी एक दिवस सहन करावे लागणार असून त्यानंतर साेमवारपासून चार दिवस विदर्भ व मराठवाड्यात ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे उन्हापासून दिलासा मिळण्याचा अंदाज आहे.

नागपूर व गाेंदिया वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यात सूर्यदेव चांगलाच तडपला आहे. सर्वच जिल्ह्यात शनिवारी कमाल तापमानात आंशिक वाढ झाली. अकाेल्यात पारा चांगलाच उसळला व सर्वाधिक ४४.३ अंशाची नाेंद झाली. याशिवाय चंद्रपूर, गडचिराेली, ब्रम्हपुरी, वर्धा, वाशिम व अमरावतीत दिवसाचा पारा ४३ अंशाच्या वर पाेहचला आहे. यवतमाळ ४२.२ अंशावर आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाहीलाही हाेत असून नागरिकांची हाेरपळ झाली आहे.नागपूर व गाेंदियात तापमानात अंशत: वाढ झाली असून पारा ४१.५ अंशावर पाेहचला. मात्र पारा सरासरीच्या खाली आहे. नागपुरात दुपारपासून आकाशात उन-सावलीचा खेळ सुरू झाला व ढगांनी सूर्याचा ताप काही प्रमाणात कमी केला.

दरम्यान विदर्भासह मराठवाड्यात ६ मे पासून पुन्हा वातावरण बदलण्याचे संकेत आहेत. मेघालयात तयार हाेणारा झंझावात तसेच मराठवाडा आणि झारखंड, ओडिशा, दक्षिण छत्तीसगड आणि विदर्भात तयार हाेणाऱ्या सायक्लाेनिक सर्क्युलेशनमुळे अवकाळी पावसाचे सावट पसरणार आहे. हे अवकाळीचे सावट १० मे पर्यंत राहण्याचा अंदाज आहे. या काळात विदर्भ व मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळासह किरकाेळ पावसाचीही शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर