शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आजचा दिवस ‘लोक’मताचा : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:22 AM

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३० उमेदवार नशीब आजमावत असून त्यात भाजपाचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, बसपाचे मोहम्मद जमाल, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर ऊर्फ सागर डबरासे, ‘बीआरएसपी’चे अ‍ॅड.सुरेश माने हेदेखील रिंगणात आहेत.

ठळक मुद्देकोण बनणार खासदार ? मतदारांमध्ये उत्सुकता, राजकीय पक्षदेखील तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३० उमेदवार नशीब आजमावत असून त्यात भाजपाचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, बसपाचे मोहम्मद जमाल, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर ऊर्फ सागर डबरासे, ‘बीआरएसपी’चे अ‍ॅड.सुरेश माने हेदेखील रिंगणात आहेत. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून ६ वाजता मतदान पूर्ण होईल. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी मतदार व विशेषत: नवमतदारांमध्ये उत्सुकता असल्याचे चित्र आहे.निवडणुकांच्या तारखेची घोषणा होण्याअगोदरच नागपूरचे राजकीय वातावरण तापले होते. प्रचारादरम्यान विविध पक्षाच्या नेत्यांनीदेखील नागपुरात उपस्थिती लावून जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. याशिवाय सर्वच उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मतदानाच्या दिवशीदेखील उमेदवार व राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी नागपूर लोकसभा मतदारसंघात २ हजार ६५ मतदान केंद्र आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या आता २१ लाख ६० हजार २३२ इतकी आहे. यात १० लाख ९६ हजार ३२९ इतके पुरुष आहेत. तर १० लाख ६३ हजार ८२८ महिला मतदार आहेत.रामटेकमध्ये १९ लाख मतदाररामटेकमध्ये एकूण १६ उमेदवार रिंगणात आहे. यात शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमान, काँग्रेसचे किशोर गजभिये, बसपाचे सुभाष गजभिये, वंचित बहुजन आघाडीच्या किरण पाटणकर-रोडगे यांचादेखील समावेश आहे. येथेदेखील सर्वच उमेदवारांनी जोर लावला होता. रामटेक लोकसभा मतदार संघात आता १९ लाख २१ हजार ४७ इतकी संख्या झाली आहे. यात ९ लाख ९६ हजार ४५६ पुरुष मतदार तर ९ लाख २४ हजार ५६१ महिला मतदार आहेत. मतदारसंघात एकूण २३६४ मतदान केंद्र आहेत.कार्यकर्त्यांचे नियोजनदरम्यान, मतदान केंद्रांजवळ विविध राजकीय पक्षांचे ‘बूथ’ राहणार आहेत. या ‘बूथ’वरील व्यवस्था, मतदारांना सहकार्य, इतर पक्षांवर नजर इत्यादींसाठी कार्यकर्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे.मतदारसंघांवर नजरनागपूरउमेदवार : ३०मतदार : २१,६०,२३२मतदान केंद्र : २,०६५रामटेकउमेदवार : १६मतदार : १९,२१,०४७मतदान केंद्र : २,३६४

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019