लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘म्युच्युअल फंड’मधील गुंतवणुकीविषयी नागरिकांना जागृत व प्रोत्साहित करण्यासाठी लोकमतच्या पुढाकाराने शिबिराचे आयोजन करण्यात आले. आपण पैसे कमविण्यासाठी काम करीत असलो तरीही पैशानेसुद्धा पैसा कमविता येतो. त्याकरिता म्युच्युअल फंड चांगला पर्याय असल्याची माहिती वाणिज्य पत्रकार प्रत्युष भास्कर यांनी शिबिरात सदस्यांना दिली.शिबिरात सीए अभिजीत केळकर उपस्थित होते. प्रास्तविक करताना त्यांनी सांगितले की, देशात उद्योग-व्यवसाय वाढत असताना लोकांची मिळकत वाढली आहे. मात्र अर्थव्यवस्थेच्या विकासात होणाऱ्या चढउतारामुळे नागरिकांमध्ये जीवनातील गरजा पूर्ण करण्याबाबत चिंता पसरली आहे. घामाचा पैसा कुठे गुंतविल्याने अधिक लाभ मिळेल, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अशावेळी म्युच्युअल फंड हा सर्वाधिक सुरक्षित, लाभदायक आणि विश्वासकारक गुंतवणुकीचा पर्याय आहे.प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात स्वत:चे घर, मुलांचे शिक्षण, कार खरेदी आणि देश-विदेशात पर्यटन करण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी सामान्य व्यक्ती दिवस-रात्र मेहनत करीत असते. कमी वेळात अधिक लाभ मिळेल, अशा ठिकाणी घामाचा पैसा गुंतविण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. सामान्यपणे बँक, एफडी, रिअल इस्टेट, सोने खरेदी, शेअर मार्केट, विमा, म्युच्युअल फंड आदी पर्याय गुंतवणुकीसाठी निवडले जातात.सोने खरेदी किंवा रिअल इस्टेट क्षेत्र अस्थिर असल्यामुळे या ठिकाणी गुंतवणूक करणे लाभदायक ठरताना दिसत नसून यातून मिळकत मिळण्याचा भरोसा नाही. दुसरीकडे बँकेत पैसा ठेवणे सुरक्षित असले तरी मिळणाºया व्याजापेक्षा महागाई अधिक वाढत असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी याबाबत अनुभव असणे आवश्यक आहे. मात्र, हे गुंतवणुकीचे क्षेत्र असल्यामुळे सामान्य नागरिकांना ते सहज शक्य नाही. विम्याचे क्षेत्रही तेवढे व्यापक आणि लाभदायक नाही.अशा परिस्थितीत केवळ म्युच्युअल फंड असे क्षेत्र आहे की, ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने अधिक लाभ आणि तुमच्या पैशाला स्थायित्व मिळू शकते. या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी व्यक्ती अनुभवी असणे गरजेचे नाही किंवा कमीत कमी पैशाची मर्यादा नाही.आजची कमाई, भविष्यात उपयोग येई, हा संदेश या उपक्रमात देण्यात आला. त्याद्वारे नागरिकांना उज्ज्वल भविष्याकरिता महिन्यातील किमान एक दिवसाची कमाई म्युच्युअल फंडमध्ये गुंतविण्याचे आवाहन प्रत्युष भास्कर यांनी केले.संचालन अनुजा घाडगे यांनी केले. कार्यक्रमात महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांच्या प्रश्नांचे समाधानकार्यशाळेत नागरिकांनी तज्ज्ञ मान्यवरांना म्युच्युअल फंडसंबंधित प्रश्न विचारले. मान्यवरांनी अतिशय विस्तारपूर्ण उत्तरे दिली. म्युच्युअल फंडचे प्रकार, लाभाची मर्यादा, कालावधी आदी शंकांचे यावेळी समाधान झाले.