शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

फ्लॅट स्कीम उभी करण्याच्या नावाखाली २० लाख रुपये घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 9:19 PM

फ्लॅट स्कीम उभी करण्याच्या नावाखाली २० लाख रुपये घेऊन गॅस एजन्सीच्या मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध बजाजनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे फसवणुकीचा आरोप : बजाजनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फ्लॅट स्कीम उभी करण्याच्या नावाखाली २० लाख रुपये घेऊन गॅस एजन्सीच्या मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध बजाजनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राजेशकुमार ऊर्फ राजसिंग तारकेश्वर सिंग असे आरोपी बिल्डरचे नाव आहे.काँग्रेसनगर चौकातील न्यू इंग्लिश शाळेजवळ फिर्यादी चंद्रशेखर दादाजी भेंडे यांची गॅस एजन्सी आहे. आरोपी बिल्डर सिंग शततारका पॅलेस दुर्गा मंदिरजवळ राहतो. सिंग याची भेंडेंसोबत जुनी ओळख आहे. भेंडे यांच्या तक्रारीनुसार, बजाज नगरातील एलआयसी कॉलनी गार्डनसमोर आशा बिल्डर यांच्या मालकीची जागा आहे. या जागेवर फ्लॅट स्कीम उभी करण्याची बतावणी करून आरोपी सिंग याने भेंडे यांच्यासोबत बिल्डिंग डेव्हलपमेंट करारनामा केला. १५ फेब्रुवारी २०१५ ते जुलै २०२० यादरम्यान आरोपीने एकूण २० लाख रुपये भेंडे यांच्याकडून घेतले. मात्र पाच वर्षे होऊनही भेंडे यांच्याशी केलेल्या करारानुसार फ्लॅट स्कीम उभी केली नाही. वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून आणि खोटे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या सिंग यांच्याविरोधात भेंडे यांनी बजाज नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशीनंतर गुरुवारी राजेश कुमार उर्फ राज सिंग तारकेश्वर सिंग विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी