लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या घटनेनंतर जवळपास सात तास ही गाडी कडक उन्हात उभी होती. दूरपर्यंत कुठेही झाडाची सावली नाही. रेल्वेने मदत पुरविण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व प्रवाशांपर्यंत मदत पोहोचू शकली नाही. अशा कठीण परिस्थितीत सात तास घटनास्थळी घालविलेल्या या गाडीतील प्रवाशांनी ‘लोकमत’कडे आपबिती सांगितली.महिला प्रवाशाला आली भोवळडिंपल शर्मा ही महिला प्रवासी ए २ कोचमध्ये गोरखपूर ते यशवंतपूर असा प्रवास करीत होती. नागपूर रेल्वेस्थानक आल्यानंतर जेंव्हा थर्ड एसी कोचमध्ये तिला हलविण्यात आले तेव्हा तिला अचानक भोवळ आली. काही वेळ रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे सुरक्षा दलाने तिला बाजूला आराम करण्यासाठी जागा दिली. त्यानंतर ती शुद्धीवर आली.गाढ झोपेत हाताला जोरदार झटका बसला‘घटना घडली तेव्हा मी आपल्या बर्थवर गाढ झोपेत होते. अचानक कर्कश आवाज झाला आणि हाताला जोरदार झटका बसून जोरात मार लागला. मार लागल्यामुळे वेदना होत होत्या. तेवढ्यात बाजूच्या प्रवाशाला मला दुखापत झाल्याचे समजले. त्यानंतर रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आली. वेळ जसजसा जात होता तशा हाताच्या वेदनाही वाढत होत्या. अशा स्थितीत काही प्रवाशांनी मला औषध दिले तर काहींनी दिलासा दिला. तेवढ्यात रेल्वेतर्फे रुग्णवाहिका आली, परंतु रस्ता खराब असल्यामुळे आणखी वेदना होतील म्हणून रेल्वेनेच प्रवास करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या चमूने घटनास्थळी उपचार केले असता हात फ्रॅक्चर असल्याचे समजले. बँडेज केल्यानंतर बरे वाटत आहे. रेल्वेतर्फेही मदत करण्यात येत आहे.’प्रतिभा श्रीवास्तव, जखमी प्रवासीजमीन फाटल्यासारखे वाटले‘मी गोरखपूरला राहतो. पत्नी आणि मुलीसोबत हैदराबादला जात होतो. गाडीचे चाक तुटले तेव्हा मी गप्पा मारण्यात गुंग होतो. अचानक जोराचा आवाज झाला आणि जमीन फाटल्यासारखे वाटले. खाली पाहिले तर कोचमध्ये मोठी भेग पडली होती. मोठी दुर्घटना घडल्याची शंका आल्यामुळे मी मोठ्याने आवाज केला. दरम्यान गाडी कंपन झाल्यासारखी हलत होती. तेवढ्यात महिला प्रवाशाचा वेदनेमुळे विव्हळण्याचा आवाज आला. मी त्वरित चेन पुलिंग केली. गाडी दोन ते तीन किलोमीटर गेल्यानंतर थांबली.’-विकास सिंग, प्रवासी
जोराचा झटका लागला अन् जमीन फाटल्यासारखी वाटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:49 PM
गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या घटनेनंतर जवळपास सात तास ही गाडी कडक उन्हात उभी होती. दूरपर्यंत कुठेही झाडाची सावली नाही. रेल्वेने मदत पुरविण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व प्रवाशांपर्यंत मदत पोहोचू शकली नाही. अशा कठीण परिस्थितीत सात तास घटनास्थळी घालविलेल्या या गाडीतील प्रवाशांनी ‘लोकमत’कडे आपबिती सांगितली.
ठळक मुद्देप्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव : सात तास कडक उन्हामुळे झाला मनस्ताप