शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपुरात बैलांवर अत्याचार, मालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 10:31 PM

जास्त पैसे मिळविण्यासाठी रखरखत्या उन्हात बंडीत अतिरिक्त भार लादून तो वाहून घेताना बैलांवर अत्याचार करणारा बैलबंडी मालक संदीप क्षीरसागर (वय ३५, रा. गरोबा मैदान) याच्याविरुद्ध लकडगंज पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. पीपल्स फॉर अ‍ॅनिमलच्या करिश्मा गिलानी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच मुक्या जनावरावर होणाऱ्या या अत्याचाराची पोलिसांनी नोंद केली.

ठळक मुद्देरखरखत्या उन्हात बंडीत लादले ओझे : लकडगंज पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जास्त पैसे मिळविण्यासाठी रखरखत्या उन्हात बंडीत अतिरिक्त भार लादून तो वाहून घेताना बैलांवर अत्याचार करणारा बैलबंडी मालक संदीप क्षीरसागर (वय ३५, रा. गरोबा मैदान) याच्याविरुद्ध लकडगंज पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. पीपल्स फॉर अ‍ॅनिमलच्या करिश्मा गिलानी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच मुक्या जनावरावर होणाऱ्या या अत्याचाराची पोलिसांनी नोंद केली.कायद्यानुसार, बैलबंडीत एकावेळी जास्तीत जास्त १२०० किलो एवढा भार लादता येतो. मात्र संदीपने २५०० किलो वजनाची लाकडं लादून बंडी हाकणे सुरू केले. तीव्र उन्हामुळे शरीराची लाही लाही होत असताना बैलांकडून तो हे ओझे वाहून घेत होता.एवढेच नव्हे तर आरोपी संदीप त्यांना तुतारीने टोचतही होता. लकडगंजच्या सुदर्शन चौकात मानद पशुकल्याण अधिकारी करिश्मा गिलानी यांना सोमवारी दुपारी ही क्रूरता दिसली. त्यांनी लकडगंज पोलिसांना याबाबत माहिती देऊन कारवाईची विनंती केली. लकडगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी संदीपकडून आधी बैलगाडीतील भार कमी करून घेतला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पशुक्रूरता अधिनियम १९६५ अन्वये कारवाई केली.विशेष म्हणजे, पशुक्रूरता अधिनियम १९६५ च्या तरतुदीनुसार बंडीचा प्रकार आणि आकारानुसार जनावरांकरवी भारवाहन मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दुसरे म्हणजे, तापमान ३८ अंशावर असेल तर दुपारी १२ ते ३ या वेळेत बैलांकरवी भार वाहून नेऊ नये, असे कायदा म्हणतो.जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता आदेशअनेक बैलबंडी मालक जास्त मिळकतीच्या लालसेने तीव्र उन्हात मर्यादेपेक्षा जास्त ओझे लादून बैलांकडून भार वाहून घेतात. लवकर पोहचण्यासाठी त्यांना टोकदार तुतारीने टोचले जाते, ही क्रूरता आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गेल्या वर्षी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी या संबंधाने एक आदेशही काढला होता. मात्र, त्याची पोलीस अथवा संबंधित यंत्रणेकडून प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे या प्रकरणातून दिसून येते.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारPoliceपोलिस