शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

ल्युडो खेळण्याच्या नावावर मुलींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागगपूर : ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर व डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागगपूर : ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर व डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळमना पोलिसांनी आरोपी डोलचंद चव्हाण (५५) यास अटक केली आहे. चव्हाणच्या शेजारी १२ व १० वर्षांच्या दोन पीडित मुली राहतात. त्यांचे आई-वडील मजुरी करतात. शनिवारी दुपारी २ वाजता मुली घरासमोर खेळत होत्या. त्याचवेळी चव्हाण तिथे आला. त्याने मुलींना ल्युडो खेळण्याचे आमिष दाखविले. दोन्ही मुली त्याला आजोबा म्हणून हाक देतात. यामुळे त्याच विश्वासाने त्या त्याच्यासोबत ल्युडो खेळायला तयार झाल्या. चव्हाणच्या घराच्या बाजूलाच एक टिनाचे शेड आहे. चव्हाण दोन्ही मुलींना तिथे घेऊन गेला. दोन्ही मुलींंनी तोंडाला कापड बांधले होते. त्यांना डोळ्यांवरही कापड बांधायला लावले. मुलींनीही तसेच केले. यानंतर चव्हाण एका मुलीशी बळजबरी करू लागला. तोंडावर कापड बांधला असल्याने ती ओरडू शकली नाही.

दरम्यान, शेजारून जाणाऱ्या एका व्यक्तीला टिनाच्या आतून आपत्तीजनक आवाज ऐकू आला. त्याने दरवाजा उघडून पाहिला असता, चव्हाण आपत्तीजनक अवस्थेत होता. त्याने परिसरातील लोकांना घटनेची माहिती दिली. परिसरातील नागरिकांनी चव्हाणची धुलाई केली. चव्हाण तेथून पळाला. मुलीच्या नातेवाइकांनी कळमना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी बलात्कार तथा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. चव्हाणला अटक करण्यात आली आहे.