रामटेक : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित करीत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. नंतर लग्न करण्यास नकार दिल्याची घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पाेलिसांनी आराेपीस अटक केली.
प्रशांत ज्ञानेश्वर आकरे (२५, रा. खरबी नाका, जवाहरनगर, भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. पीडित २१ वर्षीय तरुणी ही भंडारा येथील रहिवासी आहे. या दाेघांची आपसात ओळख झाल्यानंतर प्रशांतने तिला विश्वासात घेत तिच्याशी लग्न करण्याची बतावणी केली आणि त्यातून त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यासाठी दाेघेही रामटेक शहरात यायचे. हा प्रकार २४ एप्रिल २०१६ पासून डिसेंबर २०२० पर्यंत सुरू हाेता. त्या वेळी ती तरुणी अल्पवयीन हाेती. त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी रामटेक पाेलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून भादंवि ३७६ (२), (४) (६), पाेक्साे सहकलम ३ (१) व ॲट्राॅसिटी ॲक्ट १९९९ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी प्रशांतला अटक केली. या घटनेचा तपास उपविभाीय पाेलीस अधिकारी नयन आलूरकर करीत आहेत.