लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोनाचे रुग्ण बरे होऊन एकीकडे घरी जात असतानाच कोरोनाचा प्रभाव वाढता असल्याचे दुसरे चित्र समोर येते आहे. रविवारी नागपुरात ३ तर बुलढाण्यात १ असे चार रुग्ण कोरोनाबाधितांच्या यादीत वाढले आहेत.दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची १६ वर्षीय मुलगी तर बाधित रुग्णाच्या दुकानात काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या रुग्णासह नागपुरात बाधितांची संख्या १४ वर पोहचली आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असतानाही अनेक नागरिक विशेषत: तरुण वर्ग रस्त्यावर दिसून येत आहे. वसाहतीमध्ये व गल्लीबोळात दुपारी व सायंकाळी गप्पा रंगत आहेत. हे धोकादायक ठरणारे आहे. यातून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यामुळे घराबाहेर पडूच नका, असा वारंवार सल्ला डॉक्टर देत आहेत. शनिवारी आलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांमधून एक ४०वर्षीय व्यक्ती गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या दुकानात काम करीत होता. शुक्रवारी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता आज त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले.३७५ नमुने निगेटिव्हमेयोच्या प्रयोगशाळेला ६२ नमुने प्राप्त झाले. यातील बहुसंख्य नमुने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचे व त्यांच्या वसाहतीतील नागरिकांचे आहेत. आतापर्यंत ३८६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून ३७५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. केवळ ११ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.मेयोत संशयितांचा वॉर्ड फुल्लबाधित रुग्णांची संख्या वाढताच संशयित रुग्णांची संख्याही वाढली आहे. यात सर्वाधिक भार मेयोवर पडला आहे. मेयोने बाधित रुग्णांसाठी २० खाटांचा वॉर्ड क्र. २४, संशयित रुग्णांसाठी २०-२० खाटांचे वॉर्ड क्र. ४ व ६ उपलब्ध करून दिला आहे. आज दिवसभरात मेयोच्या दोन्ही संशयितांच्या वॉर्डमध्ये ३७ रुग्ण दाखल झाले आहे. यामुळे दोन्ही वॉर्ड फुल्ल आहेत. तर मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये २९ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. या सर्वांच्या नमुन्यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.
Corona Virus in Nagpur; नागपुरात ३ तर बुलढाण्यात १ असे एकूण चार पॉझिटिव्ह वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 2:59 PM