लैंगिक हेतू नसल्यास पाठीवरून हात फिरविणे विनयभंग नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 09:57 PM2023-03-14T21:57:33+5:302023-03-14T21:58:07+5:30

Nagpur News लैंगिक हेतू नसल्यास अल्पवयीन मुलीच्या पाठीवरून व डोक्यावरून हात फिरविल्यामुळे विनयभंग होत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला.

Touching the back is not molestation if there is no sexual intent; High Court decision | लैंगिक हेतू नसल्यास पाठीवरून हात फिरविणे विनयभंग नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय

लैंगिक हेतू नसल्यास पाठीवरून हात फिरविणे विनयभंग नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय

googlenewsNext

नागपूर : लैंगिक हेतू नसल्यास अल्पवयीन मुलीच्या पाठीवरून व डोक्यावरून हात फिरविल्यामुळे विनयभंग होत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. तसेच, आरोपीची निर्दोष सुटका केली. प्रकरणावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

मयूर बाबाराव येलोरे (२९) असे आरोपीचे नाव असून तो वर्धा येथील रहिवासी आहे. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला विनयभंगाच्या गुन्ह्यात सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंड तर, घरात बळजबरीने प्रवेश करण्यासाठी चार महिने कारावास व एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाने ती शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने ती याचिका मंजूर करून शिक्षा रद्द केली. घटनेच्या वेळी आरोपी १८ वर्षे वयाचा होता तर, पीडित मुलगी १३ वर्षे वयाची होती. पीडित मुलीला आरोपी लहानपणापासून ओळखत होता. आरोपी १५ मार्च २०१२ रोजी मुलीच्या घरी गेला होता. दरम्यान, त्याने मुलीच्या पाठीवरून व डोक्यावरून हात फिरवून ती खूप मोठी झाली, असे म्हटले. त्यामागे त्याचा वाईट हेतू होता, असा आरोप मुलीने तक्रारीत केला नाही. तिने केवळ आरोपीच्या या कृतीमुळे वाईट व अस्वस्थ वाटले, असा जबाब दिला. तसेच, आरोपीने पाठ व डोक्यावरून हात फिरविण्याशिवाय अधिक काही केल्याचे पोलिसांचे म्हणणे नाही, असे न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले. आरोपीतर्फे ॲड. अमोल हुंगे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Touching the back is not molestation if there is no sexual intent; High Court decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.