शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

गोरेवाडातील पर्यटकांत बिबट्याची दहशत

By admin | Published: January 30, 2017 2:49 AM

सध्या गोरेवाडा येथे जंगल सफारीसाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये येथील बिबट्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली

जंगलातील बिबट्यांची संख्या वाढली : ‘सायकल सफारी’चा प्रतिसाद थंडावला नागपूर : सध्या गोरेवाडा येथे जंगल सफारीसाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये येथील बिबट्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. यामुळे मागील वर्षीपासून येथे सुरू करण्यात आलेल्या ‘सायकल सफारी’ ला मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे. मात्र त्याचवेळी गोरेवाडातील वन अधिकारी पर्यटकांचा प्रतिसाद वाढतच असल्याचा दावा करीत आहे. माहिती सूत्रानुसार मागील काही दिवसांत या जंगलातील बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या येथे सुमारे तीन ते चार बिबट्यांचा अधिवास आहे. ‘सायकल सफारी’साठी जाणाऱ्या अनेक पर्यटकांना ते दिसतात. शिवाय वन कर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान ते दिसून येतात. या जंगलाच्या सभोवताल सुरक्षा भिंत तयार करण्यात आली आहे. त्यामुळे त्या बिबट्यांची येथे कोंडी होत असल्याचे बोलले जात आहे. वन विभागाने मागील वर्षीपासून येथे ‘सायकल सफारी’ चा प्रयोग सुरू केला आहे. त्यासाठी येथे सहा नवीन सायकली खरेदी करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना त्यापैकी पाच सायकली सफारीसाठी दिल्या जातात, तसेच उर्वरित एका सायकलीवर गाईड असतो. मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्या सहा सायकलीपैकी दोन सायकलीमध्ये बिघाड आला आहे. त्यामुळे सध्या चारच सायकली सुरू असून, त्यापैकी पर्यटकांना तीन सायकली दिल्या जात आहे. सध्या येथील सफारीसाठी खासगी सायकलींना प्रवेश दिला जात नाही. मात्र वन विभाग भविष्यात येथे खासगी सायकलींनासुद्धा प्रवेश देण्यासंबंधी विचार करीत असल्याची माहिती गोरेवाडाचे सहायक वनसंरक्षक (एसीएफ) बुराटे यांनी दिली. (प्रतिनिधी) पिंजऱ्यातून पळालेला बिबट सापडेना! मागील २५ दिवसांपूर्वी गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमधील पिंजऱ्यातून एक बिबट पळाल्याची घटना पुढे आली होती. या घटनेला आता महिना लोटत असताना अजूनपर्यंत त्या बिबट्याचा कुठेही शोध लागलेला नाही. शिवाय या प्रकरणी अजूनपर्यंत कोणतीही कारवाईसुद्धा झालेली नाही. विशेष म्हणजे, नागपुरात वन विभागाचे मुख्यालय आहे. येथे राज्याच्या वनबल प्रमुखांसह शेकडो वरिष्ठ वन अधिकारी बसतात. मात्र असे असताना या एवढ्या गंभीर घटनेची अजूनपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही. एका पिंजऱ्यातून बिबट अचानक गायब होतो, आणि वन विभाग मागील एक महिन्यापासून गप्प बसतो, यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जाणकारांच्या मते, आतापर्यंत संबंधित वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु मुख्यालयातील काही वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे अशा घटनांवर पडदा टाकण्याचे काम केले जात आहे.