नागपूर : कोरोना संक्रमण वाढल्याने गोरेवाडा जंगल व इंडियन सफारीत शनिवारी व रविवारी पर्यटन बंद ठेवण्यात आले आहे. गोरेवाडाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पंचभाई यांनी सांगितल्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या दिशा निर्देशानुसार निर्णय घेण्यात आला आहे, तर पेंच व्याघ्र प्रकल्प व महाराजबाग प्राणिसंग्रहालयात शनिवारी व रविवारी पर्यटन बंद ठेवण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. बोर व्याघ्र प्रकल्पातील बोर गेट आठवड्यातून दोन दिवस बंद ठेवण्यात येईल. वर्धा जिल्ह्यात शनिवारी रात्री ८ पासून सोमवारी सकाळी ८ पर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहे. त्यामुळे वर्धाकडील बोर धरणाचे गेट रविवारी बंद राहील. मात्र, अडेगाव गेट नागपूर जिल्ह्यात येत असल्याने ते रविवारी सुरू राहील. सोमवारी बोर व्याघ्र प्रकल्पाला साप्ताहिक सुट्टी असल्याने अडेगाव गेट पर्यटनासाठी बंद राहील.
गोरेवाड्यात शनिवार, रविवारी पर्यटन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:08 AM