लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवर बांधकाम सुरू असलेल्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या जेपी स्टेशनमधील एक महाकाय ८० फूट टॉवर क्रेन शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता वादळामुळे रस्त्यावर कोसळली. स्टेशनच्या बाजूला शनिवार बाजारात लोकांची गर्दी होती, पण पावसामुळे नागरिक नसल्यामुळे जीवहानी टळली. के्रनमुळे रस्त्याच्या कडेला उभी असलेली मेटॅडोर आणि चार दुचाकीचे नुकसान झाले.जेपी स्टेशनच्या बाजूला शनिवार बाजार भरतो. या बाजारात नागरिकांची गर्दी असतो. पावसामुळे नागरिक रस्त्यावर नव्हते. पाऊस नसता तर वाराणसीसारखी दुर्घटना घडली असती. घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक बंद करून दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली. यात कुणालाही इजा झाली नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा येथील सुरक्षा व्यवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. महाकाय क्रेन हटविण्याचे कार्य रात्री १० पर्यंत सुरू होते. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.वाहनांचे नुकसान, जीवहानी नाहीवर्धा रोडवर मेट्रो रेल्वेची टॉवर क्रेन वादळामुळे उंचीवरून खाली पडली. यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान झाले. कुणालाही इजा वा जीवहानी झाली नाही. क्रेनला उचलून नेण्यासाठी वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळविण्यात आली. के्रन उचलण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते.अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक, महामेट्रो.