नागपूर : ज्या वयोवृद्ध रुग्णांवर ‘ओपन हार्ट सर्जरी’ शक्य नाही त्यांच्यासाठी ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट’ (टावर) वरदान ठरत आहे. परंतु ही ‘अँजिओप्लास्टी’सारखी तातडीची प्रक्रिया नाही. किमान सात दिवसांचे नियोजन करावे लागते. परंतु एका वयोवृद्ध रुग्णाची गंभीर स्थिती पाहता आपत्कालीन स्थितीत ‘टावर’ करण्याची पहिलीच प्रक्रिया नागपुरात यशस्वी करण्यात आली.
मध्यप्रदेश येथील ७७ वर्षीय यादव त्या रुग्णाचे नाव. यादव यांच्या हृदयातील मुख्य झडप (एआॅर्टिक वॉल्व्ह) पुर्णत: खराब झाले होते. यामुळे हृदयातील रक्त फुफ्फुसात जमा होत होते. त्यांना श्वासही घेता येत नव्हता. अंत्यंत गंभीर स्थितीत त्यांना रात्री १० वाजता अरनेजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. जसपाल अरनेजा यांनी तपासल्यावर तातडीन वॉल्व्ह बदलण्याचा निर्णय घेतला.
परंतु त्यांना श्वास घेता येत नसल्याने व रक्तदाबही ८०/४० एमएम एचजीअसल्याने व्हेंटिलेटरवर घेतले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. अरनेजा म्हणाले, रुग्णाचे वय व त्यांची स्थिती पाहता ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया करून हृदयाचे वॉल्व्ह बदलणे शक्य नव्हते. त्यामुळे ‘टावर’ करण्याचा निर्णय घेतला. परंतु रुग्ण गंभीर असल्याने तातडीने ही प्रक्रिया करण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. अनुभव व कौशल्याच बळावर २४ तासात ‘टावर’ प्रक्रिया यशस्वी केली. इतक्या कमी वेळात नागपुरात पहिल्यांदा ही प्रक्रिया करण्यात आली.
अँजिओप्लास्टी सारखी राबवली ‘टावर’ प्रक्रिया
डॉ. अरनेजा म्हणाले, ‘एआॅर्टिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट’ करणाºया रुग्णाचा इको, सीटी एओर्टोग्राम सारखे चाचणी अहवाल तयार केल्यानंतर वॉल्व्हची आॅर्डर दिली जाते. त्यानंतर ‘टावर’ प्रक्रियेचे नियोजन के ले जाते. यात मांडीचा धमणीतून कॅथेटर टाकून ते हृदयापर्यंत नेऊन वॉल्व्ह रिप्लेसमेंट केले जाते. तातडीची ‘अँजिओप्लास्टी’ सारखी ही प्रक्रिया राबवली जात नाही. परंतु ७७वर्षीय रुग्णाची गरज लक्षात घेऊन २४ तासांच्या आत ‘वॉल्व्ह’ची आॅर्डर देण्यापासून ते रुग्णाच्या तपासण्या व टावर प्रक्रिया यशस्वी केली.
भविष्यात रुग्णांवर जटील शस्त्रक्रियेची गरज नाही
हृद्यरोग तज्ज्ञ डॉ. अमर आमले म्हणाले, मध्य भारतात पहिल्यांदा ‘टावर’ तंत्रज्ञान आम्ही आणले, आणि आता तातडीची टावर प्रक्रियाही यशस्वी केल्याने जीवाचा धोका असलेल्या रुग्णांसाठी ही प्रक्रिया वरदान ठरणार आहे. डॉ. विवेक मंडुरके म्हणाले, तंत्रज्ञान विकसीत होत असल्याने त्याचा फायदा रुग्णांना होत आहे. ‘टावर’ प्रक्रियेने केवळ ‘एआॅर्टिक वॉल्व्ह नव्हे तर इतर वॉल्व्ह दुरुस्ती विकसित झाली आहे. यामुळे भविष्यात रुग्णांवर फार जटील शस्त्रक्रिया करण्याची गरज पडणार नाही.