शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

नागपूरच्या पोळ्याला भोसलेकाळाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:59 PM

पोळा हा शेतकऱ्यांचा सण. अनेक वर्षांपासून उत्साहाने तो साजरा होतो. नागपुरातही बैला पोळ्याचे आणि तान्हा पोळ्याचे विशेष आयोजन असते. नागपुरातील या पोळ्याला भोसले काळापासूनची परंपरा आहे.

ठळक मुद्देभोसलेकाळात मिळाला वाव : पोळा झाला सर्वधर्मीयांचा सण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोळा हा शेतकऱ्यांचा सण. अनेक वर्षांपासून उत्साहाने तो साजरा होतो. नागपुरातही बैला पोळ्याचे आणि तान्हा पोळ्याचे विशेष आयोजन असते. नागपुरातील या पोळ्याला भोसले काळापासूनची परंपरा आहे.प्राचीन काळापासून बैल हा कृषी व्यवस्थेचा आधार आहे. त्यातूनच बैलांच्या सन्मानासाठी आणि त्यांचे ऋण म्हणून पोळा हा वैशिष्ट्यपूर्ण सन संस्कृतीमध्ये आला आहे. आजही ही परंपरा कायम असली तर त्याचा उद्देश मात्र अलिकडे धुसर होत चालला आहे. नागपुरातील ही परंपरा भोसलेकाळापासून चालत आली आहे. त्या काळात पोळा एक पर्व रूपाने मनविला जायचा. भोसलेकाळात त्याला बराच वाव मिळाला.महाल परिसरात भरायचा मोठा पोळाभोसलेकाळ सुमारे ३०० वर्षे जुना आहे. नागपुरात पोळ्याची परंपरा भोसलेकाळापासून आहे. मुलांमध्येही बैलांप्रति प्रेम निर्माण व्हावे यासाठी तान्हा पोळाच्या सणाला सुरूवात झाली. इतिहास अभ्यासक चंद्रशेखर गुप्ता याननी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात महाल परिसरात पूर्वी मोठा पोळा भरायचा. त्यानंतर जूनी शुक्रवारी व नंतर वाढलेल्या वसाहतीमधील नवी शुक्रवारीमध्ये पोळ्याचा उत्सव पार पाडला जायचा. यात सर्व समाजातील आणि धर्मातील माणसे सहभागी व्हायची तीच परंपरा आजही कायम आहे.तान्हा पोळा इव्हेंट ठरतोयलहान मुलांमध्ये बैल आणि शेतीबद्दल प्रेम निर्माण व्हावे, त्यांच्या मनात बैलांबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी तान्सा पोळा या सणाची निर्मिती झाली. लहान मुले लाकडाचे नंदीबैल तयार करून मोठ्यांचे अनुकरण करीत त्यांना सजवित असत. दिवसभर त्यांना परिचयाच्या घरी फिरवून पूजा करीत असत. त्यांना खाऊ मिळत असे. मात्र ही परंपरा आता बाजुला पडून लाकडी नंदीबैलांचा पोळा इव्हेंटसारखा होत आहे. बैल सजावट, वेशभूषा, स्पर्धा, बक्षिस वितरण यामुळे या सणाचे खरे रूप बाजुला पडले आहे.लाकडी बैल ५०० रुपयांपासून एक लाखांपर्यंतलहान मुलांच्या तान्हा पोळ्याची तयारी सुरू झाली आहे. ३१ ऑगस्टला हा सण होत आहे. त्यासाठी बाजारात लाकडी बैल विक्रीला आले आहेत. लकडगंज रोड, बुधवारी, कॉटन मार्केट, सीए रोडवर लाकडी बैलांची दुकाने लागली आहेत. मुलांची आणि पालकांची या बाजारातील दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. रंगीत बैल मुलांचे आकर्षण आहेत.बाजारात ५०० रुपयांपासून तर एक लाख रुपयांपर्यंत सागवान आणि साध्या लाकडांचे नंदीबैल उपलब्ध आहेत. या शिवाय फायबर बैलही बाजारात आले असून त्यांचीही मागणी बरीच आहे. त्यांची किंमत दोन हजारांपासून आहे.अनेक घरात जुन्या पिढीतील लाकडी बैलअनेक घरांमध्ये जुन्या पिठढीतील लाकडी नंदीबैल आहे. पोळा झाल्यावर ते जपून ठेवले जातात. मुले मोठी होऊन संसारला लागल्यावर त्यांच्या मुलांकडे अर्थात पुढच्या पिढीकडे हे लाकडी बैल सोपविले जातात. अनेक कुटुंबात असे जुने बैल आजही आहेत. यातून संस्कृतीचे हस्तांरतण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर