लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: रोगराई, संकटे, दुष्काळ, बेकारी, भ्रष्टाचार अशा समाजघातक अनिष्ट प्रथांच्या नायनाटासाठी निघत असलेली मारबत व बडग्याची मिरवणूक नागपुरात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात निघाली. शहराच्या जुन्या वस्तीत असलेल्या महाल परिसरातून ही मिरवणूक दरवर्षी निघत असते.काय आहे मारबत आणि बडग्या?
मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पुर्वी, बांकाबाई हिने ईंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.या मध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत.बाकांबाईच्या नवर्यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला 'बडग्या' म्हणतात.या दिवशी(श्रावण अमावस्येच्या दुसऱ्यादिवशी)नागपूर व जवळपासच्या गाव-खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहानग्यांना घेउन येतात.मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात.ही एक प्रकारे जत्राच आहे. तेथे अनेक फेरीवाले फुगे,खेळणी इ.वस्तु विकतात.या वेळेस पावसाळयाच्या जोर कमी झाला असतो.शेतीची कामेपण बहुदा झालेली असतात.त्यामुळे शेतकऱ्यांना व इतरेजनांना हा एक विरंगुळा वाटतो. ईंग्रजांचे राज्य जाऊन आज कितीतरी वर्षे लोटली. परंतु, नागपूरकर आणि या परीसरातील नागरीकांच्या मनात बांकाबाईच्या कुकृत्यामुळे झालेली जखम अजुन भळभळतेच आहे.
काळ्या मारबतीला १३७ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३३ वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाचवेळी निघत असतात. ब्रिटिश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. परकीय गुलामगिरीचे पाश तुटून देश स्वतंत्र व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. ती परंपरा आजतागायत सुरू आहे.