शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

मनपातर्फे रोडवर पे अ‍ॅण्ड पार्क करून वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 8:38 PM

महानगरपालिका हद्दीतील बाजारव्यवस्थेच्या नियमाप्रमाणे वाहनांकरिता पार्किंगच्या जागा आरक्षित ठेवण्याची जबाबदारी मनपाची आहे. पण मनपातर्फे रोडवर पे अ‍ॅण्ड पार्क करून वाहतुकीची कोंडी होत आहे.

ठळक मुद्देग्राहक पंचायतचा आरोप : मनपाच्या राखीव पार्किंगच्या जागा गेल्या कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिका हद्दीतील बाजारव्यवस्थेच्या नियमाप्रमाणे वाहनांकरिता पार्किंगच्या जागा आरक्षित ठेवण्याची जबाबदारी मनपाची आहे. पण मनपातर्फे रोडवर पे अ‍ॅण्ड पार्क करून वाहतुकीची कोंडी होत आहे. मनपाच्या बाजारव्यवस्थेत अस्तित्वातील पार्किंगच्या राखीव जागा गेल्या कुठे, असा सवाल अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी उपस्थित केला आहे.मनपा हद्दीतील सीताबर्डी, रामदासपेठ, सेंट्रल बाजार रोड, इतवारी, महाल, लकडगंज, वर्धमाननगर, सक्करदरा, धरमपेठ, काँग्रेसनगर, प्रतापनगर, सदर, गोकुळपेठ, खामला, वर्धा रोड येथील बाजाराचे ठिकाण, व्यापारी संकुले व इतर ठिकाणी मनपाच्या नियमाप्रमाणे पार्किंगच्या जागा असणे बंधनकारक आहे. परंतु सध्या पार्किंगच्या राखीव जागा कुठेही सोडलेल्या दिसत नाहीत. त्या जागा व्यावसायिकांना विकल्याने पार्किंगची समस्या बिकट झालेली आहे. वाहनचालकांना रस्त्यांवर पार्किंग करावे लागते आणि पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. यासाठी मनपाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप पांडे यांनी केला.मनपाचा २२ रस्त्यांवर पे-अ‍ॅण्ड पार्कचा प्रस्ताव आहे. पुलाखाली किंवा मोठ्या रस्त्यांवर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करणार आहे. हा प्रस्ताव हास्यास्पद असून अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहतुकीला अडथळा आणि अपघाताची शक्यता निर्माण होणार आहे. याला पंचायतचा विरोध असून याकरिता पंचायतने पर्याय सुचविला होता, याकडे पांडे यांनी लक्ष वेधले.सर्व सरकारी कार्यालये, विद्यापीठ परिसर, शैक्षणिक संस्था, बँका, बहुसंख्य मॉल, लॉन, मंगल कार्यालये, मॉल, सिनेमागृहे, हॉस्पिटल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यापारी संकुले या सर्व ठिकाणी ग्राहकांकडून शुल्क आकारले जाते. या ठिकाणी पार्किंगची नि:शुल्क व्यवस्था करण्याची व वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित अधिकारी व व्यवस्थापकांचीच आहे. मनपाने बाजार व्यवस्थेतील राखीव पार्किंगच्या जागा जागा त्वरित रिकाम्या करून तिथे नि:शुल्क पार्किंग उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.नि:शुल्क पार्किंग व्यवस्थेबाबत ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांसोबत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित कार्यालय प्रमुखांच्या बैठका झाल्या आहेत. त्यात जीपीओ, आरटीओ, मनपा कार्यालये, एनआयटी येथे नि:शुल्क पार्किंगच्या व्यवस्थाही केलेल्या होत्या, याकडेही पांडे लक्ष वेधले आहे. मनपातर्फे लोकांकडून भरमसाट कर आकारण्यात येतो. त्यानंतरही पार्किंगचे शुल्क चुकीचे आहे. अधिकृत पार्किंग व्यवस्था नसताना शहरात अनेक ठिकाणी अवैध पार्किंग शुल्क आकारल्या जात आहे. यावर मनपा प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचा आरोप ग्राहक पंचायतने केला आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाParkingपार्किंग