शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
3
अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 
4
“मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
5
एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश
6
"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
7
₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला
8
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी
9
नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू
10
"काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील"; वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत म्हणाले, "तुम्ही मेरिटवर बोलत असाल तर..."
11
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
12
Waaree Energies IPO allotment status: Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता
13
क्रिकेटच्या मैदानात 'बुद्धिबळातील चाल': टॉम लॅथमच्या विकेटसाठी R Ashwin नं असं विणलं जाळं (VIDEO)
14
उमेदवार जाहीर करण्याबाबत महायुतीने घेतली आघाडी; लोकसभा निवडणुकीपासून घेतला बोध!
15
डॉलरची दादागिरी संपुष्टात येणार? भारत-रशिया-चीनने बनवला प्‍लॅन, अमेरिकेच्या सर्वात मोठ्या ताकदीला आव्हान
16
'गजनी २'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात! आमिर खानसोबत दिसणार साऊथमधील 'हा' मोठा सुपरस्टार
17
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
18
Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
19
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
20
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही

पुढच्या महिन्यात सुरू होणार वाडीच्या उड्डाणपुलावरून वाहतूक; पुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर

By नरेश डोंगरे | Published: June 10, 2024 11:43 PM

या पुलाच्या दोन्ही बाजूला लँडिंग काँक्रीट टाकले जात आहे. वर्षभरापूर्वी १३२ च्या हाय टेंशन लाईनची उंची वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळण्यास विलंब झाल्याने हे काम प्रभावित झाले.

नागपूर : अमरावती मार्गावरच्या वाडी पोलिस ठाण्यापासून नाका नंबर १० पर्यंत तयार होत असलेल्या उड्डाणपुलावर वाडी टी पॉइंट निश्चित करण्यात आला आहे. हायटेंशन लाईनची उंची कमी असल्यामुळे हे काम रेंगाळले होते. मात्र, हे काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुढच्या महिन्यात या पुलावरून वाहतूक सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.

या पुलाच्या दोन्ही बाजूला लँडिंग काँक्रीट टाकले जात आहे. वर्षभरापूर्वी १३२ च्या हाय टेंशन लाईनची उंची वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळण्यास विलंब झाल्याने हे काम प्रभावित झाले. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि बरीच गैरसोय झाल्यानंतर आता नागरिकांना अमरावती मार्गावरच्या दोन उड्डाणपुलांपैकी २.५ किलोमीटर लांब वाडी पोलिस स्टेशन ते गुरुद्वारापर्यंतचा पूल लवकरच सुरू होणार आहे. हा पूल झाल्यानंतर वाडी टी- पॉइंटवर वाहनांच्या गर्दीपासून दिलासा मिळू शकतो. मात्र, पुलावरचे आणि खालच्या मार्गाचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण पावसाळा सुरू होत आहे. येथे कामात विलंब झाल्यास पावसामुळे पुन्हा व्यत्यय येईल. सूत्रांच्या माहितीनुसार अचानक वाडी उड्डाणपुलाच्या कामाच्या पूर्णत्वाची अचानक डेटलाईन तयार करण्यात आली आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत मंत्रिमहोदयांच्या हस्ते या पुलावरच्या वाहतुकीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला जाऊ शकतो.एक वर्षाची मुदतवाढ

वाडी उड्डाणपुलासोबतच अमरावती मार्गावर आरटीओ कार्यालयापासून युनिव्हर्सिटी कॅम्पसपर्यंत २.९ किलोमीटरचा दुसरा पूलसुद्धा तयार केला जात आहे. मात्र, त्याच्या कामाची गती फारच मंद आहे. आरटीओ कार्यालयाकडे लँडिंगसाठी अजून भूमी अधिग्रहण व्हायचे आहे. महापालिकेकडे वृक्ष कटाईची परवानगी मिळायची आहे. त्यामुळे या पुलाच्या कामासाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ मागण्यात आली आहे.

- अमरावती मार्गावरील उड्डाणपुलाचे काम मार्च २०२२ ला सुरू झाले.

- प्रकल्प मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची होती अपेक्षा- आता मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार दुसरा उड्डाणपुल

- पीडब्ल्यूडी एनएच डिव्हीजन करीत आहे पुलाचे बांधकाम