शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

वाहतूक पोलीस झाले ‘कॅशलेस’

By admin | Published: March 28, 2017 1:44 AM

वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना सापडल्यास आता वाहन चालकांना टपाल खात्यातच दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.

टपाल खात्यातच भरावी लागणार दंडाची रक्कम : गुढीपाडव्यापासून सुरुवात नागपूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना सापडल्यास आता वाहन चालकांना टपाल खात्यातच दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. वाहतूक पोलीस गुढीपाडव्यापासून ही दंडाची रक्कम स्वीकारणे बंद करणार आहे. शहर पोलिसांनी ६ आॅक्टोबर २०१६ रोजी ई-चालानची सुरुवात केली होती. याअंतर्गत हेल्मेट, सीट बेल्ट आदीचे चालान केले जात होते. वाहतूक पोलीस वाहन चालकांचे फोटो काढून त्यांच्या पत्त्यावर चालान पाठवितात. वाहन चालकांना टपाल खात्यात चालान भरावे लागते. चालकांना शिस्त लावणे आणि कॅशलेस व्यवस्था लागू करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. ई-चालानमुळे वाहन चालकांमध्ये हेल्मेट वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच वाहतूक विभागाच्या कामकाजातही पारदर्शकता आली आहे. ई-चालानला मिळणारा प्रतिसाद पाहता पोलीस वाहतूक विभागाने आता वाहन चालकांकडून वसूल करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या दंडाची रक्कम स्वीकार न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलीस केवळ चालानची पावती वाहन चालकाला देईल. चालकाला दंडाची रक्कम टपाल खात्यात जाऊन जमा करावी लागेल. आतापर्यंत वाहतूक विभागाचे पोलीस घटनास्थळावरच दंडाची रक्कम स्वीकार करायचे. अशावेळी त्यांच्यावर वसुली करीत असल्याचा आरोपही लागायचा. जागीच दंड न भरणाऱ्यास वाहतूक विभागाच्या संबंधित शाखेत जाऊन दंड भरावा लागत होता. चालान कारवाई दरम्यान वाहन चालकांकडून जप्त दस्तावेज टपाल खात्यात दंड भरण्याची पावती सादर केल्यावर सोपविले जातील. दस्तावेज नसल्यास वाहनाला डिटेन केले जाईल. पूर्णपणे कॅशलेस झाल्याने वाहतूक विभागाचे काम कमी होईल आणि वाहतूक नियमांबाबत चालकांमध्येही गांभीर्य निर्माण होईल. (प्रतिनिधी)