नागपूर : शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचशील चौक येथील नाग नदीवरच्या पुलाचा काही भाग कोसळला होता. या पुलाचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पुनर्बांधणी करणार आहे. पुलाचा बांधकामासाठी जवळपास ६ कोटी खर्चाचा अंदाज असनू, याकार्यास किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी दिली. त्यामुळे झाशी राणी चौक ते पंचशील चौक दरम्यानची वाहतूक ४ महिने बंद राहणार आहे.नुकसानग्रस्त पुलाबद्दल नरेश बोरकर यांनी सांगितले की, पंचशील चौक ते झाशी राणी चौक या दरम्यान नाग नदीवर हा पुल बांधण्यात आला होता.
ज्याची १९७४ साली रुंदीकरण व सुधारणा करण्यात आली होती. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओवरफ्लो झाल्याने नाग नदीला पूर आला आणि या पुरामुळे पुलाचा काही भाग क्षतिग्रस्त झाला आणि नदीत कोसळला. तेव्हापासून पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. आता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पुलाचे नूतनीकरण करणार आहे. या कामासाठी जवळपास ६ कोटी रुपय इतका खर्च अपेक्षित असून, संपूर्ण कार्य पूर्ण होण्यासाठी किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्नसध्या पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद असून, हलक्या वाहनांसाठी वाहतूक खुली करण्याकरिता प्रत्यन करण्यात येणार आहेत. पुलाची पाहणी केली असून, नुकसानग्रस्त भागाला सिमेंटच्या काठ्याने बंद करण्यात येऊन काही भाग वाहतुकीस खुला करण्याची शक्यता पडताळणी करण्यात येणार असल्याचेही बोरकर यांनी सांगितले.