लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुरी रेल्वेस्थानकावर १४ ते २० सप्टेबर दरम्यान यार्ड रिमॉडेलिंगचे काम आणि इंटरलॉकिंगचे काम सुरु असल्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतून येणाऱ्या रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्या आहेत. दुसरे नॉन इंटरलॉकिंगचे काम २१ ते २४ सप्टेबर दरम्यान होणार आहे. त्यामुळे १९ सप्टेबरला १८४०५ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. ही गाडी २० सप्टेबरला नागपुरात येणार नाही. १४ आणि २१ सप्टेबरला अहमदाबादवरून सुटणारी अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. ही गाडी १५ आणि २२ सप्टेबरला नागपुरात येणार नाही. १४ आणि २१ सप्टेबरला गांधीधामवरून सुटणारी १२९९३ गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्यामुळे १५ आणि २२ सप्टेबरला ही गाडी नागपुरात येणार नाही. १५ आणि २२ सप्टेबरला १२२९५ पुरी-गांधीधाम ही गाडी रद्द केल्यामुळे १६ आणि २३ सप्टेबरला ही गाडी नागपुरात येणार नाही. १२१४५ कुर्ला-पुरी एक्स्प्रेस १६ सप्टेबरला रद्द करण्यात आल्यामुळे १७ सप्टेबरला ही गाडी नागपुरात येणार नाही. तर १२१४६ पुरी-कुर्ला ही गाडी १८ सप्टेबरला रद्द केल्यामुळे ही गाडी १९ सप्टेबरला नागपुरात येणार नाही.टॉवर वॅगन रुळाखाली घसरलीकसारा आणि उंबेरमाली दरम्यान १३ आणि १४ सप्टेबरच्या रात्री टॉवर वॅगन रुळाखाली घसरल्यामुळे मुंबई-नागपूर दरम्यानच्या रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्या. यात मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसला बदललेला मार्ग कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, मनमाड या मार्गाने चालविण्यात आले. एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, एलटीटी-गुवाहाटी एक्स्प्रेसला दिवा, वसई, जळगाव, भुसावळ या मार्गाने चालविण्यात आले. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसला नाशिक रोड येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आले. येथूनच सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिक-नागपूर म्हणून चालविण्यात आली. एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसला दुपारी १.२० वाजता, एलटीटी-दरभंगा २ वाजता, वाराणसी-कामयनी एक्स्प्रेस २.३० वाजता चालविण्यात आली. मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळेपेक्षा ६ तास उशिराने धावत आहे.