शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 9:54 PM

बुधवारी रात्री ११.१५ वाजता नागपूरजवळ गोधनी आणि भरतवाडा दरम्यान भिलाईवरून अलाहाबादला जात असलेल्या आयर्न स्टीलने भरलेल्या मालगाडीचे पाच वॅगन रुळावरून घसरले. रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

ठळक मुद्देरात्रभर सुरू होते काम : प्रवाशांची झाली गैरसोय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बुधवारी रात्री ११.१५ वाजता नागपूरजवळ गोधनी आणि भरतवाडा दरम्यान भिलाईवरून अलाहाबादला जात असलेल्या आयर्न स्टीलने भरलेल्या मालगाडीचे पाच वॅगन रुळावरून घसरले. यामुळे ओएचई (ओव्हर हेड इक्विपमेंट) तारेचे खांब पडले. या घटनेमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.मालगाडीचे वॅगन रुळावरून घसरल्यामुळे नागपूर-इटारसी सेक्शनच्या अप लाईनवर अजनी-नागपूर दरम्यान १२६४३ तिरुअनंतपुरम-दिल्ली निजामुद्दीन एक्स्प्रेस १.२५ तास, २२४१५ विशाखापट्टनम-दिल्ली एक्स्प्रेस १.१० तास, १६०३१ चेन्नई-कटरा एक्स्प्रेस १.२० तास, १९६०४ रामेश्वरम-अजमेर हमसफर एक्स्प्रेस १.२० तास, २२४०४ पाँडेचरी-नवी दिल्ली एक्स्प्रेस ३ तास, १२२८५ बंगळुरू-दानापूर संघमित्रा एक्स्प्रेस ३ तास, बुटीबोरी ते नागपूर दरम्यान १२७२१ हैदराबाद-दिल्ली निजामुद्दीन एक्स्प्रेस ३ तास, १२५३९ यशवंतपूर-लखनौ एक्स्प्रेस बोरखेडी-नागपूर दरम्यान ३ तास अडकून पडल्या. अप लाईनवर बुधवारी आणि गुरुवारी रात्री १.१५ वाजेपासून वाहतूक सुरळीत झाली. २२११२ नागपूर-भुसावळ एक्स्प्रेसला सकाळी ७.२० ऐवजी ११.२० वाजता, ५१८२९ नागपूर-इटारसी पॅसेंजरला सकाळी ८ ऐवजी दुपारी १.०२ वाजता रवाना करण्यात आले. नागपूर-इटारसी सेक्शनच्या डाऊन लाईनवर १२८०४ विशाखापट्टनम स्वर्णजयंती एक्स्प्रेस कळमेश्वरमध्ये ४.४० तास, १२७०८ एपी संपर्कक्रांती एक्स्प्रेस कळमेश्वरमध्ये ५.०५ तास, २२४१६ आंध्रप्रदेश एक्स्प्रेस कोहळी रेल्वेस्थानकावर ५.१८ तास, १२६४८ दिल्ली-कोईम्बतुर कोंगु एक्स्प्रेस काटोल रेल्वेस्थानकावर ३.३० तास, १८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस नरखेड आणि कळमेश्वर दरम्यान ५ तास, १२६२६ दिल्ली-तिरुअनंतपुरम एक्स्प्रेस नरखेड-कळमेश्वर दरम्यान ४.३० तास, १२४३४ चेन्नई राजधानी एक्स्प्रेस पांढुर्णा-गोधनी दरम्यान ४.३० तास, १२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस पांढुर्णा-गोधनी दरम्यान ६ तास, १२७२१ हैदराबाद-दिल्ली दक्षिण एक्स्प्रेस कळमेश्वरमध्ये १.१० तास आणि २२६९२ बंगळुरू-राजधानी एक्स्प्रेस कळमेश्वरमध्ये १.१० तास अडकून पडली. गुरुवारी सकाळी ५.२० वाजता डाऊन लाईनवरील वाहतूक सुरळीत झाली. याशिवाय १२५८९ गोरखपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसला बदलविलेल्या मार्गाने नरखेड, चांदूरबाजार, न्यू अमरावती, वर्धा या मार्गाने रवाना करण्यात आले. मालगाडीला रुळावर आणण्याचे काम रात्रभर सुरू होते. रेल्वेचे अधिकारी नियंत्रण कक्ष आणि घटनास्थळावर परिस्थितीचा आढावा घेत होते. रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वेगाड्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना नागपूर रेल्वेस्थानकावर मोफत चहा, बिस्कीट देण्यात आले. उद्घोषणा प्रणालीच्या माध्यमातून रेल्वेगाड्यांची माहिती देण्यात आली. तसेच हेल्पलाईन बूथवर प्रवाशांना सहकार्य करण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात