शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

कामठीतील बफल फायरिंग रेंज स्थानांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:43 AM

नागरिक व जनावरांना वारंवार इजा पोहोचण्याच्या घटना लक्षात घेता कामठीतील सैनिक प्रशिक्षण केंद्रातले बफल फायरिंग रेंज दुसरीकडे स्थानांतरित करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी ......

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी : विविध विषयांवर बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिक व जनावरांना वारंवार इजा पोहोचण्याच्या घटना लक्षात घेता कामठीतील सैनिक प्रशिक्षण केंद्रातले बफल फायरिंग रेंज दुसरीकडे स्थानांतरित करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याकडे केली.भामरे यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बैठक झाली. त्यात बावनकुळे यांनी संरक्षण मंत्रालयाशी संबंधित विविध प्रश्न मांडले. दरम्यान, सर्व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले. कामठीतील बफल फायरिंग रेंजमध्ये झाडण्यात येणाºया गोळ्यांमुळे अनेकदा नागरिक व जनावरे जखमी होतात. अशा घटना टाळण्यासाठी रेंजचे आधुनिकीकरण करण्याचा विचार पुढे आला होता. परंतु, बावनकुळे यांनी रेंजच दुसरीकडे स्थानांतरित करण्याची मागणी लावून धरली. त्यांची मागणी अंतिम निर्णय घेण्यासाठी स्वीकारण्यात आली.कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिराच्या विकासाकरिता राज्य शासनाने १८५.२३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. विकास कामांसाठी मंदिराला लागून असलेली संरक्षण मंत्रालयाची ९.८७ हेक्टर जमीन घेण्यात आली आहे. त्याऐवजी मंत्रालयाला जांबुळवन, जि. अहमदनगर येथील ३८.८४ हेक्टर जमीन देण्यात आली आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली. एनएचएआय व मिलिटरी प्रशासन यांच्यातील जमिनीच्या वादामुळे कामठीतील छावणी भागातून जाणाºया महामार्गाचे काम रखडले आहे. भामरे यांनी काम सुरू ठेवण्याचे व हा वाद संयुक्त सर्वेक्षण करून निकाली काढण्याचे निर्देश दिलेत.बैठकीत आर्मीचे क्वार्टर मास्टर जनरल अशोक आम्रे, डीजीडीई अजयकुमार शर्मा, अतिरिक्त सहायक जनरल राकेश मित्तल, मेजर जनरल डी. व्ही. सेठिया, कामठी ब्रिगेडियर डी. व्ही. सिंग, नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मिलिंद साळवे, मनपा उपायुक्त रवींद्र देवतळे, नासुप्रचे अधीक्षक अभियंता राजीव पिंपळे, एस. जी. गणोरकर, कामठी गुरुद्वारा समितीचे ब्रिज मल्होत्रा, नरेंद्र भुतानी आदी उपस्थित होते.अन्य महत्त्वाचे निर्णयछावणीतील नागरिकांसाठीच्या पाणीपुरवठा योजनेला तत्त्वत: मान्यता देण्यात आली.कन्हान घाट व छावणीतील महादेव घाटाच्या सौंदर्यीकरणासाठी लीजवर जागा देण्याकरिता संयुक्त सर्वेक्षण करण्यात येईल. राज्य शासनाने कन्हान घाटाकरिता ३९४.४९ तर, महादेव घाटासाठी ४३८.९८ लाख रुपयांना मंजुरी दिली आहे.नागपूर-जबलपूर रोडवरील ईदगाहकरिता संरक्षण मंत्रालयाची ९०२५ चौरस फुट जमीन देण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाईल.