शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

राज्यातील ४५ हजार होमगार्डस् व अधिकारीवर्गासह कर्मचाऱ्यांचे पगार एचडीएफसीत ट्रान्स्फर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2022 7:00 AM

Nagpur News राज्यातील ४५ हजार होमगार्ड्स आणि कार्यालयीन कामे सांभाळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन आता एचडीएफसी बँकेतून होणार आहे.

ठळक मुद्देबदल्यात मिळणार विम्याचे सुरक्षाकवच

 

नरेश डोंगरे 

नागपूर:  राज्यातील ४५ हजार होमगार्ड्स आणि कार्यालयीन कामे सांभाळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन आता एचडीएफसी बँकेतून होणार आहे. कोट्यवधींच्या या आर्थिक उलाढालीच्या बदल्यात बँकेकडून होमगार्डसना आरोग्य सुविधा आणि विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होण्याच्या पूर्वसंध्येला हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे.

पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड प्रत्येक ठिकाणी सेवा देतात. गणेशोत्सव, नवदुर्गा-नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी, ईद आणि इतर सर्व सणोत्सवांसह विविध प्रकारच्या मोठ्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी केंद्राने राज्य सरकारला ५३,८७६ होमगार्डची सेवा घेण्यासाठी मुभा दिली आहे. मात्र, ही सेवा कायमस्वरूपी नाही. ती नैमित्तिक असल्याने यांपैकी ४५ हजार होमगार्ड राज्य शासनाच्या गृहरक्षक दलाच्या वेतनपटलावर आहेत. या सर्वांकडून अनेकदा धोक्याच्या ठिकाणीही सेवा घेतली जाते. मात्र, पगाराव्यतिरिक्त त्यांना कोणतेही सुरक्षाकवच दिले जात नाही. ही बाब लक्षात घेता, होमगार्डस यांनाही किमान विम्याचे सुरक्षा कवच मिळावे, म्हणून राज्याचे पोलीस महासंचालक आणि होमगार्ड महासमादेशक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वर्षभरापासून राज्य शासनाकडे संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून पाठपुरावा चालविला होता. विविध बँकांकडे या संबंधाने विचारणाही करण्यात आली होती. त्याला सर्वांत चांगला प्रतिसाद एचडीएफसीने दिला. या पार्श्वभूमीवर, कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून शासनाने १ जुलैपासून होमगार्डचे वेतन एचडीएफसीतून करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

वार्षिक साडेतीनशे कोटींचा खर्च

होमगार्ड तसेच संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि इतर खर्चासंबंधीचा एकूण वार्षिक खर्च ३५० कोटी रुपये आहे. यापूर्वी ४५ हजार खात्यांपैकी २३ हजार वेतन खाती भारतीय स्टेट बँकेत आणि इतर महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक आधी खात्यांत संलग्न होती. मात्र, त्या बदल्यात या बँकांकडून होमगार्डस्ना कोणताही लाभ मिळत नव्हता.

चार लाखांचा विमा

एचडीएफसीच्या ऑफरनुसार होमगार्डसना एकूण ५० लाख रुपयांच्या विम्याचे विनामूल्य कवच देण्याचे कबूल केले आहे. त्यात चार लाखांचा तातडीचा विमा, वैद्यकीय खर्चासाठी रोज विशिष्ट रक्कम यांचाही त्यात समावेश आहे.

हक्काचे सुरक्षाकवच मिळाले - पोलीस महासंचालक

सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे होमगार्ड्स ना त्यांच्या हक्काचे सुरक्षाकवच मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया यासंबंधाने पोलीस महासंचालक आणि राज्याचे होमगार्ड महासमादेशक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले.

 

---

टॅग्स :Governmentसरकार