शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

जिल्हा परिषदेतील ५०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या वेळापत्रक जाहीर; ९ ते १२ मे दरम्यान विभागनिहाय नियोजन

By गणेश हुड | Published: April 28, 2023 6:46 PM

Nagpur News शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हा स्तरावर २० टक्के बदल्या होणार आहे. यात प्रशासकीय व विनंती बदल्यांचा प्रत्येकी १० टक्के समावेश आहे. कर्मचाऱ्यांची संख्या विचारात घेता ५०० हून अधिक बदल्या होण्याची शक्यता आहे.

गणेश हूड                                                                                                                             

नागपूर : शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हा स्तरावर २० टक्के बदल्या होणार आहे. यात प्रशासकीय व विनंती बदल्यांचा प्रत्येकी १० टक्के समावेश आहे. कर्मचाऱ्यांची संख्या विचारात घेता ५०० हून अधिक बदल्या होण्याची शक्यता आहे. बदल्यांचे वेळापत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार ९ ते १२ मे दरम्यान विभागनिहाय समुपदेशन पद्धतीने सर्वसाधारण बदल्या होणार आहेत.

९ मे रोजी आरोग्य व शिक्षण विभाग, १० मे रोजी वित्त, जलसंधारण, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण विभाग, ११ रोजी सामान्य प्रशासन तर १२ मे रोजी पंचायत विभागाच्या बदल्या करण्यात येतील. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय १५ मे २०१४ मधील तरतुदीनुसार शिक्षक संवर्ग वगळून या बदल्या होतील. बदल्यांच्या वेळी पदाधिकाऱ्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात येणार आहे. ५३ वर्षांवरील, विधवा, परित्कत्या, दुर्धर आजार, मतिमंद मुलांचे पालक व इतर निकष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बदली पासून सुट मिळणार आहे. तर विनंती बदल्या करताना रिक्त जागा विचारात घेतले जाणार आहे. प्रशासकीय बदल्या करताना १० वर्ष किंवा दीर्घ वास्तव्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय बदली होणार आहे.वर्षानुवर्षे दुर्गम भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या बदली प्रक्रियेत त्यांचे सोयीचे गाव मिळेल, अशी अपेक्षा कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सोहन चवरे यांनी व्यक्त केली.९०६ शिक्षकांच्या बदल्याशिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रीया सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू असून ९०६ शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील. बदली झालेल्या शिक्षकांना १ ते १५ मार्चपर्यंत कार्यमुक्त करण्याचे प्रशाकीय आदेश निर्गमित करावयाचे आहे. तर ३१ मे पर्यत प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्यात येणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद