नागपूर : नागपूर ग्रामीणचे पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील ३९ पाेलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत शुक्रवारी (दि. ४) आदेश जारी केले. यात पाेलीस निरीक्षक, सहायक पाेलीस निरीक्षक व उपनिरीक्षक अधिकाऱ्यांचा समावेश असून, पाेलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या आठ पाेलीस अधिकाऱ्यांकडे ठाण्यांची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. याअंतर्गत प्रशासकीय बदल्या असल्याचेही राकेश ओला यांनी स्पष्ट केले.
मुख्यालयातील पाेलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांची कुही, सायबर सेलचे यशवंत कदम यांची कन्हान, जयपाल गिरासे यांची नरखेड, हेमंतकुमार खराबे यांची माैदा, पुंडलिक भटकर यांची खापरखेडा, प्रमाेद मकेश्वर यांची रामटेक, ओमप्रकाश काेकाटे यांची बुटीबाेरी, अजय मानकर यांची खापा पाेलीस ठाण्यात ठाणेदारपदी तर पाेलीस उपनिरीक्षक संताेषसिंह ठाकूर यांना कळमेश्वर ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.
वाचक शाखेतील पाेलीस निरीक्षक संताेष वैरागडे यांची पारशिवनी, बुटीबाेरीचे आसिफराजा शेख यांची कळमेश्वर, कळमेश्वरचे मारुती मुळूक यांची एमआयडीसी बुटीबाेरी, नियंत्रण कक्षातील यशवंत साेळसे यांची उमरेड, एमआयडीसी बुटीबाेरीचे विनाेद ठाकरे यांची अराेली, रामटेकचे दिलीप ठाकूर यांची केळवद येथील ठाणेदारपदी तर, माैद्याचे ठाणेदार मधुकर गीते यांची जिल्हा विशेष शाखेत, राजेंद्र निकम यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत, उमरेडचे ठाणेदार विलास काळे यांची नियंत्रण कक्षात, जलालखेडा येथील ठाणेदार तथा सहायक पाेलीस निरीक्षक दीपक डेकाटे यांची मानव संसाधन शाखेत, अराेलीचे ठाणेदार विवेक साेनवणे यांची रामटेक ठाण्यात बदली करण्यात आली.
कुहीचे ठाणेदार पंजाबराव परघने यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी साेपविण्यात आली असून, वाहतूक शाखेचे पाेलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली. माैदा येथील सहायक पाेलीस निरीक्षक मंगेश काळे यांना जलालखेडा येथील ठाणेदारपदी नियुक्ती देण्यात आली.
---
‘एपीआय’ व ‘पीएसआय’ बदलले
कळमेश्वरचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार यांची स्थानिक गुन्हे शाखा, सतीश साेनटक्के यांना बुटीबाेरी, प्रवीण मुंडे व तेजराम मेश्राम यांना कळमेश्वर, पाेलीस उपनिरीक्षक आशिष माेरखेडे यांना बुटीबाेरी, पूनम काेरडे यांना काटाेल, विनाेद मांढरे यांना सावनेर, शिवाजी बाेरकर यांना रामटेक, प्रकाश बुंदे यांना कळमेश्वर, राजू कपाटे यांना कन्हान, राजू डाेर्लीकर यांना उमरेड, जगदीश बिराेले यांना माैदा ठाण्यात नियुक्ती दिली. हे सर्व अधिकारी नियंत्रण कक्षात कार्यरत हाेते. नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक विकास मुंढे यांची सायबर सेलमध्ये, कुही येथील उपनिरीक्षक प्रमाेद राऊत यांना रामटेक व देवलापारचे अनिल देरकर यांना कुही पाेलीस ठाण्यात नियुक्ती दिली आहे.