शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

वनविभागातील ६९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 7:05 AM

राज्याच्या महसूल व वनविभागाने सोमवारी भारतीय वन सेवेतील ५३ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदलीची पहिली जादी जाहीर केली आहे.

ठळक मुद्देगोरेवाडाला पंचभाई येणारअनेकांना पदोन्नती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या महसूल व वनविभागाने सोमवारी भारतीय वन सेवेतील ५३ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदलीची पहिली जादी जाहीर केली. या सोबतच सहायक वनसंरक्षक संवर्गातील १० अधिकाऱ्यांच्या बदल्यांची दुसरी आणि विभागीय वन अधिकारी गट अ (वरिष्ठ श्रेणी) पदावरील ६ अधिकाऱ्यांच्या बदलीची तिसरी यादी जाहीर केली. अशा एकूण ६९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून वनविभागाने फेरबदलाचे संकेत दिले आहेत.पहिल्या यादीमध्ये ५३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात बहुतेक अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या आहेत. यात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावरील एक अधिकारी, मुख्य वनसंरक्षक पदावरील ८, वनसंरक्षक पदावरील १५ आणि उपवनसंरक्षक पदावरील २९ अधिकाºयांचा समावेश आहे.पुणे येथील मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी बढती मिळाली असून मुख्यालय पुणे येथे त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. चंद्रपूर वन अकादमीचे संचालक अ.ना. खडसे यांना मुख्य महाव्यवस्थापक (औषधी वनस्पती, एफडीसीएम) नागपूर येथे मुख्य वनसंरक्षक श्रेणीत पदोन्नती मिळाली आहे.चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक श्री.एस. रामराव यांची त्याच पदावर यवतमाळ येथे प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त पदावर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक व क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांना पदोन्नती मिळाली आहे. प्रवीण यांच्या रिक्त होणाऱ्या पदावर ठाणे येथील उपवनसंक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना पदोन्नती मिळाली आहे.धुळे येथील मुख्य वनसंरक्षक ए.एस. कळसकर यांना विनंतीवरून सदस्य सचिव, म.रा. प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नागपूर येथे देण्यात आले आहे. यवतमाळचे वनसंक्षक आर. के. वानखेडे यांची मुख्य वनसंरक्षक, शिक्षण व प्रशिक्षण पदावर पुणे येथे पदोन्नतीने बदली झाली आहे.गोंदियाचे उपवनसंरक्षक श्री. एस. युवराज यांची गिन्नी सिंह यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या संरक्षक, नियोजन व व्यवस्थापन, वन्यजीव, नागपूर या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. तर गिन्नी सिंह यांची मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर या पदी प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात आली आहे.उपवनसंरक्षक (संसाधन उपयोग) नागपूरचे डॉ. किशोर मानकर यांना वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, नागपूर येथे तर, एन.एस. लडफत, गाभा क्षेत्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक यांना वनसंरक्षक, (कार्य आयोजना) पुणे पश्चिम येथे पदोन्नती मिळाली आहे. बुलडाण्याचे उपवनसंरक्षक एस. एन. माळी पदोन्नतीने कार्य आयोजना, पूर्व नागपूर येथे येत आहेत. बल्लारपूरचे उपवनसंरक्षक व्ही. एन. हिंगे यांची तिथेच वनसंरक्षक (वाहतूक व विपणन) पदी पदस्थापना झाली आहे.पुणे येथील उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी यांची प्रशासकीय कारणावरून नागपूर येथे त्याच पदावर (मानव संसाधन, व्यवस्थापन) बदली झाली आहे. अमरावतीचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे आता मंत्रालय महसूल व वनविभाग येथे जात आहेत. बांबू व संशोधन प्रशिक्षण केंद्र चिचपल्लीचे संचालक राहुल पाटील पुणे येथे उपवनसंरक्षक पदावर जात आहेत. त्यांच्या रिक्त पदावर पांढरकवड्याच्या उपवन संरक्षक के.एम. अभर्णा येत आहेत.मध्य चांदा उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांची ठाणे येथे तर यवतमाळचे उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे यांची ठाणे मुख्य वनसंक्षक (वन्यजीव) येथे प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात आली आहे. पिंगळे यांच्या जागेवर हिंगोलीचे विभागीय वन अधिकारी केशव वाबळे येत आहेत. तर हिरे यांच्या जागेवर पुुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे येत आहेत. भंडाऱ्याचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग विनंती अर्जावरून जळगावला जात आहेत.मेळघाटचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार उपवनसंरक्षक सिपना येथे उपवनसंरक्षक (वन्यजीव) पदावर जात आहे. चंद्रपूरचे विभागीय वन अधिकारी ए. एल. सोनकुसरे पुसदला उपवनसंरक्षक पदावर जात आहेत.गोरेवाडाचे विभागीय वन अधिकारी नंदकिशोर काळे हे गाभा क्षेत्र, ताडोबा-अंधारी येथे जात आहेत. तर, (प्रशिक्षणावर असलेले) विभागीय वन अधिकारी पी.बी. पंचभाई हे आता गोरेवाडा विभागीय व्यवस्थापक म्हणून येत आहेत. विभागीय वन अधिकारी, राज्य प्राणिसंग्रहालय नागपूर येथील विभागीय वन अधिकारी के. डब्ल्यू धामगे हे यवतमाळला उपवनसंक्षक म्हणून जात आहेत.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग