लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नेतृत्वाच्या वादातून करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तृतीयपंथी चमचम गजभियेची प्रकृती अद्यापही गंभीरच आहे. दरम्यान, मोठी रक्कम खर्च करूनही रुग्णालय प्रशासनाकडून योग्य उपचार करण्यात आले नाही त्यामुळे चमचमची प्रकृती सुधारत नसल्याचा आरोप करून चमचमच्या साथीदारांनी आज घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. त्यानंतर दुपारी कामठी मार्गावरील खासगी रुग्णालयातून चमचमला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले.कळमन्यातील कामनानगरात मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास तृतीयपंथीयांचा गुरू म्हणून ओळखला जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह चमचम गजभियेवर प्राणघातक हल्ला चढवला होता. तेव्हापासून चमचम अत्यवस्थ अवस्थेत आहे. तृतीयपंथीयांच्या गटाची गादी (गुरू पद) आणि रोजच्या कमाईतील हिस्सा मिळावा यासाठी सध्याचा गुरु उत्तमबाबा याला चमचमने विरोध चालविला होता. त्याने आपला गट निर्माण केला, तो रोजची हजारोंची कमाई लपवून योग्य तेवढा हिस्सा प्रामाणिकपणे देत नसल्याचे लक्षात आल्याने उत्तमबाबा त्याच्यावर चिडून होता. गेल्या आठवडाभरापासून पैशाच्या हिस्सेवाटणीमुळे ही धुसफूस तीव्र झाली होती. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी दुपारी १. ३० वाजता रोजची फेरी आटोपून प्रवीण ऊर्फ चमचम प्रकाश गजभिये चमचम आणि तिचे साथीदार घरी परतले होते. चमचमच्या कामनानगरातील घरी ते पैशाची हिस्सेवाटणी करून पांगले असतानाच उत्तमबाबा, चट्टू ऊर्फ कलम उईके, किरण गौरी, निसार शेख आणि साथीदार चमचमच्या घरी पोहचले. त्यांनी चमचमवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला होता. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाली. चमचमला तिच्या सहकाऱ्यांनी कामठी मार्गावरील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे कळमन्यात तणावही निर्माण झाला होता. दरम्यान, कळमना पोलिसांनी उत्तम बाबा आणि साथीदारांना अटक केली.रुग्णालयासमोर तणावतीन दिवसात चमचमच्या साथीदारांनी औषधोपचारावर हजारोंचा खर्च केला. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही त्यामुळे शहरातील तृतीयपंथीयांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच मोठ्या संख्येत तृतीयपंथीयांनी रुग्णालयात धाव घेतली. योग्य उपचार होत नसल्याचा आरोप करून त्यांनी तेथे जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे रुग्णालयातसमोर तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलीस पोहचले. त्यानंतर चमचमला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले.
तृतीयपंथी चमचमची प्रकृती गंभीर : नाराज साथीदारांनी केली घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 9:48 PM
नेतृत्वाच्या वादातून करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तृतीयपंथी चमचम गजभियेची प्रकृती अद्यापही गंभीरच आहे. दरम्यान, मोठी रक्कम खर्च करूनही रुग्णालय प्रशासनाकडून योग्य उपचार करण्यात आले नाही त्यामुळे चमचमची प्रकृती सुधारत नसल्याचा आरोप करून चमचमच्या साथीदारांनी आज घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. त्यानंतर दुपारी कामठी मार्गावरील खासगी रुग्णालयातून चमचमला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले.
ठळक मुद्देदुसऱ्या रुग्णालयात हलविले