लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नेतृत्वाच्या मुद्यावरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तृतियपंथियांच्या दोन गटातील वादाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. सेनापती म्हणून ओळखला जाणा-या तृतियपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील तृतियपंथी चमचमवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाली. कळमन्यातील कामनानगरात मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.नागपूर - विदर्भाच्या तृतियपंथियांच्या गटाची गादी उत्तमबाबा काही वर्षांपासून सांभाळतो आहे. त्याच्या नेतृत्वाला तृतियपंथियांच्याच दुस-या एका गटाचा तीव्र विरोध आहे. या विरोधामुळे उत्तर नागपूरात दोन्ही गटांकडून परस्परांवर हल्ले, एकमेकांना धमक्या देणे आदी प्रकार घडले आहेत. दोन वर्षांपूर्वी उत्तमबाबाने विरोधी गटातील तृतियपंथियांवर फायरिंगही केली होती. तर, विरोधी गटाने वर्षभरापूर्वी जोरदार हल्ला चढवून त्याला मारहाणही केली होती. पाचपावली, लकडगंज, वर्धमाननगर, जरीपटका, तहसील आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन्ही गटांनी परस्परांविरोधात अनेक तक्रारी नोंदविल्या आहेत. त्यांच्यातील हाणामा-या आता नेहमीचाच प्रकार घडला आहे. गेल्या आठवडाभरापासून या दोन गटातील धूसफूस पुन्हा तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी दुपारी अडीच वाजता उत्तमबाबाने त्याच्या साथीदारांसह कळमन्यातील कामनानगरात राहणा-या चमचमच्या घरी जाऊन चमचमवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाले. दरम्यान, बाजुची मंडळी धावली आणि त्यांनी उत्तमबाबा तसेच साथीदाराला आवरले. गंभीर जखमी झालेल्या चमचमला रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती कळताच कळमना परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. शहरातील तृतियपंथियांनी मोठ्या संख्येत रुग्णालय आणि कळमना ठाण्यात धाव घेतली. ठाण्यासमोर त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी धावपळ करून उत्तमबाबाला ताब्यात घेतले आहे.
नागपुरात तृतीयपंथी उत्तमबाबाने केला विरोधी गटातील चमचमच्या हत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 3:30 PM
नेतृत्वाच्या मुद्यावरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तृतियपंथियांच्या दोन गटातील वादाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. सेनापती म्हणून ओळखला जाणा-या तृतियपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील तृतियपंथी चमचमवर प्राणघातक हल्ला चढवला.
ठळक मुद्देचाकूने भोसकलेकळमन्यात प्रचंड तणाव