लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : नागपूर जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसताना रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक सुरूच आहे. माैदा पाेलिसांनी नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील महालगाव (ता. कामठी) शिवारात नुकत्याच केलेल्या कारवाईमध्ये विना राॅयल्टी रेतीची वाहतूक करणारे दाेन ट्रक पकडले. त्यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ट्रक व रेती, असा एकूण ४० लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
मिलिंद सुदाम सुखदेवे (३५, रा. पलाडी, जिल्हा भंडारा) व कैलास खुशाल भाेंदे (३१, रा. अंबाडी, जिल्हा भंडारा), अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे असून, दाेघेही ट्रकचालक आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माैदा पाेलिसांनी नागपूर-भंडारा महामार्गावर नाकाबंदी केली हाेती. नाकाबंदीदरम्यान दाेन ट्रक (क्र. एमएच-३६/एए-०७६२ व क्र. एमएच-३६/एए-१३४६) भंडाऱ्याहून नागपूरच्या दिशेने जाताना त्यांना दिसले. संशय आल्याने पाेलिसांनी दाेन्ही ट्रक महालगाव शिवारात अडवून झडती घेतली. त्या ट्रमध्ये रेती असल्याचे आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. त्या दाेन्ही ट्रकमधील रेती ही एकाच राॅयल्टीवर दुसऱ्यांदा वाहून नेली जात असल्याचे स्पष्ट झाले.
ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी दाेन्ही ट्रकच्या चालकांना अटक केली आणि त्यांच्याकडून रेतीसह ट्रक ताब्यात घेतला. या कारवाईत ४० लाख रुपये किमतीचे दाेन ट्रक आणि ३२ हजार रुपये किमतीची आठ ब्रास रेती, असा एकूण ४० लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार हेमंत खराबे यांनी दिली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक अरविंद माेहाेड यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.