शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

टॅक्स, टोल व डिझेल दराच्या ओझ्याखाली दबले ट्रान्सपोर्टर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 10:46 AM

Nagpur News डिझेलच्या वाढत्या दरासह टॅक्स आणि टोलच्या ओझ्याखाली ट्रान्सपोर्टर्स दबले असून, सध्या रस्त्यावर धावत असलेले ५० टक्के ट्रक पुढे धावणार वा नाहीत, अशी भीती ट्रान्सपोर्टर्सला आहे.

ठळक मुद्दे केंद्र व राज्याने आर्थिक पॅकेज द्यावेतर ट्रक रस्त्यावर धावणे बंद होणार

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डिझेलच्या वाढत्या दरासह टॅक्स आणि टोलच्या ओझ्याखाली ट्रान्सपोर्टर्स दबले असून, सध्या रस्त्यावर धावत असलेले ५० टक्के ट्रक पुढे धावणार वा नाहीत, अशी भीती ट्रान्सपोर्टर्सला आहे.

गाडी खरेदी करताना रोड टॅक्सचा भरणा पूर्वीच करावा लागतो. कमी ट्रक रस्त्यावर धावत असल्याने आणि या व्यवसायात मंदीचे वातावरण असल्याने कुणीही नवीन ट्रक खरेदीच्या मनस्थितीत नाही. निरंतर रोजगार मिळत नसल्याने अनेक ड्रायव्हर आणि क्लिनर कामावर येत नाहीत. सध्या त्यांचाही तुटवडा जाणवत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दुकाने दुपारी ४ वाजता बंद होत असल्याने अनेक दुकानदारांनी माल बोलविणे बंद केले आहे. त्यामुळे बरीच मालवाहतूक थांबली आहे. त्याचाही फटका ट्रान्सपोर्टर्सला बसला आहे.

वर्षभरात डिझेलचे दर प्रति लिटर ३० रुपयांनी वाढून ९५.५४ रुपयांवर पोहोचले आहे. डिझेलच्या वाढत्या किमतीनंतरही मालवाहतुकीचे भाडे वाढले नाही. पूर्वी मुंबईपर्यंत भाड्याचे १० हजार रुपये मिळायचे. डिझेलचे दर वाढल्यानंतरही तेवढेच भाडे मिळत आहे. मुंबईपर्यंतच्या मार्गावर ट्रकचालकाला जवळपास १५०० हजार रुपये टोल द्यावा लागतो. मालवाहतुकीचे दर कमी मिळत आहेत, त्यानंतर कुणीही ग्राहक सोडण्यास तयार नाही. ट्रक रस्त्यावर धावावा, या उद्देशाने कमी दरातही मालवाहतूक करीत असल्याचे ट्रॅकर्स युनिटी नागपूरचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी सांगितले.

ट्रकला ५० टक्के डिझेलचा खर्च

मालवाहतूक करताना ट्रकला जवळपास ५० टक्के डिझेलचा खर्च येतो. त्यामुळे जास्त अंतरावर नफा ना तोटा, तत्त्वावर ट्रक न्यावे लागतात. पण कमी अंतरासाठी वाहतूकदारांना खिशातून पैसे टाकावे लागतात. तसे पाहता डिझेलच्या वाढत्या किमतीनुसार ट्रकचे प्रति टन भाडे ५०० ते ६०० रुपयांनी वाढले आहे. ट्रक मालकाला २५ ते ३० टक्के भाडेवाढ हवी आहे. पण सध्या ५ टक्के वाढ झाली आहे. त्यानंतरही वाढीव भाडे ग्राहक देत नाहीत. हा व्यवसाय पूर्णपणे संकटात आहे. केंद्र आणि राज्य शासनाने या व्यवसायाला आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी मारवाह यांनी केली. डिझेलच्या वाढत्या किमतीनुसार मुंबईचे भाडे २ हजार रुपये प्रति टन, दिल्ली ३,८०० रुपये, कोलकाता ४,२०० रुपये, चेन्नई ४,४०० रुपये आणि हैदराबाद १,८०० रुपये अशी वाढ झाली आहे. पण वाढीव भाडे देण्यास कुणीही तयार नाही.

जीएसटीच्या टप्प्यात आणावे पेट्रोल व डिझेल

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या टप्प्यात आणावे. त्यामुळे दरवाढीवर नियंत्रण येईल. इंधनावर लागणारे अतिरिक्त कर रद्द करावेत. त्यामुळे ट्रान्सपोर्टर्सला दिलासा मिळेल. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाका