लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छतेत नागपूर शहर अव्वल यावे यासाठी महापालिका प्रशासनाने जोर लावला आहे. परंतु आरोग्य विभागाकडून यावर पाणी फेरले जात आहे. घराघरातून कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस कंपनीचा करार संपुष्टात येणार असल्याने नोव्हेंबर अखेरीस दोन कंपन्यांची नियुक्ती केली जाणार आहे. करार संपुष्टात येणार असल्याने कनक रिसोर्सेस कंपनी कचरा उचलण्याचे काम व्यवस्थित करीत नसल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.रामदासपेठ, सिव्हील लाईन, धरमपेठ, गोकुळपेठ, सीताबर्डी, इतवारी, महाल आदी भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहे. यामुळे स्वच्छ भारत अभियानात महापालिका माघारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत मोहीम २०१९ मध्ये नागपूरचे रॅकिंग ५८ वरून टॉप १० शहरात आणण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.कचरा संकलनासाठी महापालिकेने शहराचे दोन पॅकेजमध्ये विभाजन केले आहे. यात झोन एक ते पाच पॅकेज-१ मध्ये तर सहा ते दहा झोनचा पॅकेज -२ मध्ये समावेश करून दोन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. कचरा संकलनाचे काम सुरू करण्यासाठी ९० दिवसांची मुदत दिली आहे. दोन्ही कंपन्यांनी १६ नोव्हेंबरला काम सुरू करावयाचे आहे. दोन पाळीत कचरा उचलावयाचा आहे. त्यामुळे ४७२ वाहनांच्या जागी जादाची वाहने लागणार आहे. परंतु पाळीत काम करण्याच्या प्रक्रियेत नागरिक भरडले जाण्याची शक्यता आहे.रामदासपेठ, धंतोली, धरमपेठ, सिव्हील लाईन, गोकुळपेठ, लक्ष्मीनगर, प्रतापनगर अशा पॉश वस्त्यात कचरा संकलन करणारी वाहने दररोज येत होती. परंतु कनकचा करार रद्द करण्याचा निर्णय झाल्यापासून यात अनियमितता वाढली आहे. कचरा उचलण्याची यंत्रणा कोलमडली आहे. अशा परिस्थितीत शहरालगतच्या भागाचा विचार न केलेला बरा.मिळालेल्या माहितीनुसार उत्तर, पूर्व, दक्षिण नागपूर लगतच्या आऊ टर भागात एक-एक आठवडा कचरा गाडी येत नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने कचरा रस्त्यावर वा मोकळ्या भूखंडावर टाकावा लागतो. सफाई कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळी देण्यात आल्या. परंतु त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. त्यांची मनमानी सुरू आहे. एकंदरित शहरातील स्वच्छता यंत्रणा कोलमडली आहे.कनकने ठरल्यानुसार काम करावेघराघरातून दररोज कचरा संकलित होत नसल्याचे प्रकरण आयुक्त अभिजित बांगर यांनी गांभीर्याने घेतले आहे. कनकने जितक्या वर्षासाठी करार केला होता, त्याहून अधिक कालावधी देण्यात आला. निविदा काढण्यात आली. परंतु कनक पात्र ठरली नाही. त्यामुळे नवीन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. जोपर्यंत कनककडे जबाबदारी आहे. तोपर्यंत ठरल्यानुसार काम करणे आवश्यक आहे. कचरा संकलन करणारी वाहने दररोज येत नसल्यास नागरिकांनी यासंदर्भात आरोग्य विभाग, झोन कार्यालयाकडे तक्रार करावी. त्यानुासर योग्य कार्यवाही केली जाईल. स्वच्छतेबाबतच्या तक्रारींचा निपटारा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.अभिजित बांगर, आयुक्त महापालिकादोन कंपन्या नियुक्तघरातून व बाजार भागातील कचरा संकलित करण्याच्या नवीन व्यवस्थेवर महापालिका प्रशासन काम करित आहे. यासाठी दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात ए. जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. ठाणे व बीवीजी इंडिया लिमिटेड, पुणे यांचा समावेश आहे. १६ नोव्हेंबरपासून दोन्ही कंपन्यांना काम सुरू करावयाचे आहे. दीड महिन्यात ४७२ वाहने, १५०० हून अधिक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा उभारावयाच्या आहे. त्यानंतर घराघरातून कचरा संकलन करण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. यात विविध शर्तींचा समावेश असल्याने नारिकांना त्रास होण्याची शक्यता आहे.नियुक्तीपूर्वीच वाददोन पॅकेजसाठी बीवीजी इंडिया लिमिटेडने १६५६ व १८०० रुपये प्रतिटन दराच्या कचरा संकलनासाठी निविदा भरल्या होत्या. मात्र शर्तीनुसार यातील एकाच पॅकेजसाठी कंपनी काम करू शकते. त्यामुळे कंपनीने पॅकेज दोनसाठी काम करण्याची तयारी दर्शविली. पॅके ज एक दुसऱ्या क्रमांकावरील ए.जी. एन्वायरो कंपनीला प्रतिटन १९०० रुपयाहून अधिक दराने रक्कम देण्याची घोषणा केली आहे. यामुळे महापालिकेवर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक बोजा वाढणार आहे. शहरात कचरा संकलनाचे १०० स्टेशन आहेत. येथे कचरा साठविला जातो. नवीन व्यवस्थेत १० ट्रान्सफर स्टेशन उभारले जाणार आहे.
नागपुरातून कचरागाड्या गायब; रस्त्यांवर पसरली घाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 1:07 AM
स्वच्छतेत नागपूर शहर अव्वल यावे यासाठी महापालिका प्रशासनाने जोर लावला आहे. परंतु आरोग्य विभागाकडून यावर पाणी फेरले जात आहे.
ठळक मुद्देदररोज गाड्या येत नसल्याने नागरिक त्रस्तशहरालगतच्या भागातील परिस्थिती गंभीरस्वच्छ भारत अभियानावर प्रश्नचिन्ह