लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘ट्रॉमा केअर सेंटर’ रुग्णसेवेत सुरू झाल्यापासून रुग्णांची गर्दी वाढत आहे. परंतु येथे प्रतीक्षालयाची सोय नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांवर उघड्यावर थांबावे लागत आहे. याला घेऊन ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल मेडिकल प्रशासनाने घेतली. यातच ईशान्य रोटरीने प्रतीक्षालयाची जबाबदारी घेतल्याने येत्या दोन महिन्यात याचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.मेडिकलमध्ये विदर्भच नव्हे तर छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश येथून रुग्ण येतात. ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू झाल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तीन माळ्यांचे आणि ९० खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर पुढील महिन्यापर्यंत पूर्णक्षमतेने सुरू होणार आहे. सद्यस्थितीत येथील सर्वच खाटा फुल्ल आहेत. परंतु या ‘ट्रॉमा’ला प्रतीक्षालय नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणीचे जात आहे. बहुसंख्य रुग्णांचे नातेवाईक याच परिसरात आपले बस्तान मांडतात. उघड्यावर जेवण, खरकटे व इतर कचरा तिथेच टाकला जात असल्याने परिसर घाण व दुर्गंधीच्या विळख्यात सापडलाआहे. ‘लोकमत’ने ‘रुग्णांचे नातेवाईक उघड्यावर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. शासनाकडून निधी उपलब्ध होण्याची वाट न पाहता ईशान्य रोटरी संस्थेला प्रतीक्षालयाच्या बांधकामासाठी विनंती केली. त्यांनी नातेवाईकांची गरज लक्षात घेऊन तत्काळ संमती दिली. प्रतीक्षालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ईशान्य रोटरी संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. राज गजभिये, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पराते, डॉ. मुरारी सिंग आदी उपस्थित होते.दीड हजार स्क्वेअर फुटामध्ये बांधकामट्रॉमा केअर सेंटरचे प्रतीक्षालय साधारण दीड हजार स्क्वेअर फुटामध्ये असणार आहे. येथे एकाच वेळी १००ते १५० रुग्णांचे नातेवाईक बसू शकतील, अशी सोय असेल. पाणी व स्वच्छतागृहाची व्यवस्था केली जाणार आहे. ईशान्य रोटरी संस्था परिसराचे सौंदर्यीकरणही करून देणार आहे. धर्मशाळेची कधी मिळणार मदतट्रॉमा केअर सेंटरच्या प्रतीक्षालयात केवळ बसण्याची सोय राहणार आहे. यामुळे निवासाचा प्रश्न कायम आहे. ‘ट्रॉमा’च्या हाकेच्या अंतरावर धर्मशाळा आहे. रुग्णाच्या निवासाच्या सोयीसाठी या धर्मशाळेला मेडिकलची जागा देण्यात आली आहे. परंतु येथे खासगी व्यावसायिकांचा ताबा वाढल्याने नातेवाईकांना उघड्यावर दिवस-रात्र काढावी लागत आहे.
नागपुरातील ‘ट्रॉमा’मध्ये दोन महिन्यात प्रतीक्षालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 9:34 PM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘ट्रॉमा केअर सेंटर’ रुग्णसेवेत सुरू झाल्यापासून रुग्णांची गर्दी वाढत आहे. परंतु येथे प्रतीक्षालयाची सोय नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांवर उघड्यावर थांबावे लागत आहे. याला घेऊन ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल मेडिकल प्रशासनाने घेतली. यातच ईशान्य रोटरीने प्रतीक्षालयाची जबाबदारी घेतल्याने येत्या दोन महिन्यात याचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्दे मेडिकल : १५० वर रुग्णांच्या बसण्याची व्यवस्था