लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे गाडीतून उतरलेल्या प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचे स्टॅम्प लावण्यात येतात. परंतु बुधवारी रेल्वे प्रशासनाने उतरलेल्या प्रवाशांच्या हातावर एप्रिल महिन्यातील स्टॅम्प लावल्यामुळे ते खुलेआम बाहेर फिरत आहेत.बुधवारी सकाळी ११.३० वाजता नवी दिल्ली विशाखापट्टणम या गाडीतून एक प्रवासी उतरला. रेल्वे स्थानकावर त्याचे तापमान मोजण्यात आले. त्यानंतर त्याच्या हातावर १४ दिवस होम क्वारंटाईनचा स्टॅम्प मारण्यात आला. त्याच्यासोबत इतर प्रवाशांच्या हातावरही तोच स्टॅम्प लावण्यात आला. घरी आल्यानंतर हा स्टॅम्प एप्रिल महिन्यातला असल्याचे संबंधित प्रवासाच्या लक्षात आले. या स्टॅम्पचा फायदा घेऊन संबंधित प्रवासी बाहेर फिरत असल्याची माहिती आहे. त्यामुळे रेल्वेने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ऑगस्टमध्ये प्रवास, होम क्वारंटाईनचे शिक्के एप्रिलचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 8:39 PM
रेल्वे गाडीतून उतरलेल्या प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचे स्टॅम्प लावण्यात येतात. परंतु बुधवारी रेल्वे प्रशासनाने उतरलेल्या प्रवाशांच्या हातावर एप्रिल महिन्यातील स्टॅम्प लावल्यामुळे ते खुलेआम बाहेर फिरत आहेत.
ठळक मुद्दे रेल्वेचा गलथानपणा उघड : प्रवासी फिरताहेत घराबाहेर