शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

कोषागारचे अकाऊंट सेक्शन खाक

By admin | Published: May 13, 2017 2:36 AM

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कोषागार कार्यालयातील अकाऊंट सेक्शनमध्ये शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली.

 महत्त्वपूर्ण दस्तऐवजासह सर्व्हर रूमही जळाली : कोट्यवधींचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कोषागार कार्यालयातील अकाऊंट सेक्शनमध्ये शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. यामुळे परिसरातील लोक हादरून गेले होते. या आगीत अकाऊंट सेक्शन पूर्णपणे खाक झाला. यात महत्त्वपूर्ण दस्तऐवजासह फर्निचर, कॉम्प्युटरसह कोट्यवधीचे साहित्य जळून खाक झाले. याच विभागातील सर्व्हर रूमही पूर्णत: जळाली. शुक्रवारी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास कोषागार कार्यालयातील पहिल्या माळ्यावर असलेल्या अकाऊंट सेक्शनमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. अचानक याच विभागातील सर्व्हर रूममध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे आढळून आले. आगीचा भडका उडताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत कार्यालय रिकामे केले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु तोपर्यंत संपूर्ण अकाऊंट सेक्शन आगीत खाक झाले होते. या आगीत अकाऊं ट सेक्शनमधील सर्व्हर रूम पूर्णत: जळाली. यातील इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळून खाक झाले. टेबल खुर्च्याही जळाल्या. टेबलावरील दस्तऐवज जळाले. यात विविध विभागातील महत्त्वाचे बिल असतात. ते सर्व जळालेत. विभागातील संपूर्ण विजेची लाईन जळून खाक झाली. कॉम्प्युटर, मॉनिटर, की, बोर्ड, केबल लाईन संपूर्ण जळाले. जेवणही करता आले नाही कोषागार कार्यालयातील काही अधिकारी कर्मचारी जेवण करायचे होते. या आगीत अनेकांचे जेवणाचे डबेही जळून खाक झाले. एक कर्मचारी किरकोळ भाजला आग लागली तेव्हा प्रचंड धूर निघत होता. काही कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील अग्निशमन यंत्राद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला. यातच धूर बाहेर निघावा म्हणून एका कर्मचाऱ्याने खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला. यात तो किरकोळ भाजला गेला. आग लागली की लावली ? कोषागाराला लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी या आगीबाबत परिसरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. कोषागारात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्र असतात. त्यामुळे ही आग कुणी लावली की लावण्यात आली, अशी चर्चाही परिसरात होती.