मेयोमध्ये वरिष्ठ डॉक्टर ‘ऑनकॉलवर’च
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) सुटीच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही दुपारी २ नंतर बहुसंख्य वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयात नसतात. ते ऑनकॉलवर असतात. यामुळे निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे. रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
‘सुपर’मध्ये ओपीडीत वाढ
नागपूर : मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची संख्या वाढली. विशेषत: सोमवार ते गुरुवारपर्यंत रुग्णांची संख्या रोज ७०० वर जाते. विशेषत: मेंदू व हृदयविकाराचे रुग्ण खूप जास्त राहतात. कोविडचे नियम पाळून रुग्णांची तपासणी करणे कठीण जात आहे. रुग्णांचे नियोजन होणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टर वर्तवीत आहे.
अजनीचे झाले कचरा डम्पिंग यार्ड
नागपूर : नवीन बाभुळखेडाला लागून असलेल्या अजनी क्वॉर्टरच्या रस्त्यावर बहुसंख्य नागरिक कचरा टाकतात. यामुळे परिसराला कचरा डम्पिंग यार्डचे स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे, नवीन बाभुळखेड्यात पहाटे ६.३० वाजता कचरागाडी येते. परंतु यावेळेत बहुसंख्य नागरिक झोपेत असतात. परिणामी, अनेक जण घरातील कचरा अजनी क्वॉर्टरच्या परिसरात टाकून मोकळे होतात. धंतोली झोनचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.