रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. गडकरी यांच्या पाहणीदरम्यान रुग्णालयाचे प्राचार्य डाॅ. माेहन येवले आणि मेडिसिन विभागप्रमुख डाॅ. अर्चना दाचेवार यांनी रुग्णालयाबाबत सविस्तर माहिती दिली. रुग्णालयाचे संचालन मैत्री परिवार संस्थेच्या सहयाेगाने केले जाईल. महापालिकेद्वारे ऑक्सिजन लाइन, औषध, जेवण, डाॅक्टर्स व नर्सेस्ची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, गिरीश व्यास, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, उपायुक्त मिलिंद मेश्राम, भारतीय वैद्यक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश शर्मा, सचिव डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय, ट्रस्टी संजय जोशी, डॉ. संजय शर्मा, डॉ. जयकृष्ण छांगाणी, डॉ. मनीषा कोठेकर, हर्षा छांगाणी, मैत्री परिवारचे अध्यक्ष संजय भेंडे आदींची उपस्थिती हाेती.
पक्वासा रुग्णालयात उद्यापासून काेराेना रुग्णांचा उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:08 AM