रामटेक : तालुक्यातील नगरधन-काचूरवाही-भंडारबाेडी जि.प. सर्कलचे सदस्य दुधराम सव्वालाखे यांच्या सहकार्यातून परिसरातील गावात वृक्षलागवड अभियान राबविण्यात आले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गावांमध्ये भेटी देत वृक्षाराेपण करण्यात आले. शिवाय राेपट्यांच्या संगाेपनाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला निर्देश देण्यात आले. यावेळी काचूरवाही व बाेरी ग्रामपंचायत येथे वृक्षाराेपण व संवर्धनाचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला अनिल मुटकुरे, काचूरवाहीचे सरपंच शैलेश राऊत, परमात्मा एक संस्थेचे अध्यक्ष अंकुश गाेल्हर, लहू बावनकुळे, गजानन भलमे, शुभम कामडे, सरपंच रितेश झाडे, सरपंच प्रतिभा बबलू मडावी, नरेश अनोले, पवन उईके, ग्रामविकास अधिकारी समाधान वानखेडे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डाॅ. स्मिता काकडे, डाॅ. माे. इब्राहिम, अनिता वाघमारे, शीला गडपायले, निर्मला हिवरे, वंदना बिरणवार, रितेश बिरणवार, अमोल मुटकुरे, बबलू मडावी, हरी तुपट, वसंता खरकाटे, महेंद्र दिवटे, अर्जुन बावनकर, बलदेव कुंभरे, शुभम दिवटे, संतोष साकोरे, मनोज लिल्हारे, जगदीश उपराडे, मनोज सहारे, नरेंद्र बावनकुळे, यादवराव टेकाम, गज्जू भलमे तसेच गावकरी उपस्थित हाेते.