शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

झाडे पडली; सहा जखमी  घरात पाणी शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:43 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात हुलकावणी देणाºया पावसाचे गणेशोत्सवात दमदार आगमन झाले आहे. परंतु पावसाचा पॅटर्न काहिसा बदलला आहे. शहराच्या सर्व भागात पाऊ स न पडता काही भागात मुसळधार तर कुठे हलक्या स्वरूपाचा पडत आहे. मंगळवारी उत्तर व पूर्व नागपुरात मुसळधार पाऊ स झाला. यामुळे अनेक वस्त्यांत पाणी साचले. ...

ठळक मुद्देउपराजधानीत पाऊस मुक्कामी : वस्त्या झाल्या जलमय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात हुलकावणी देणाºया पावसाचे गणेशोत्सवात दमदार आगमन झाले आहे. परंतु पावसाचा पॅटर्न काहिसा बदलला आहे. शहराच्या सर्व भागात पाऊ स न पडता काही भागात मुसळधार तर कुठे हलक्या स्वरूपाचा पडत आहे. मंगळवारी उत्तर व पूर्व नागपुरात मुसळधार पाऊ स झाला. यामुळे अनेक वस्त्यांत पाणी साचले. शहरात ठिकठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या.पावसामुळे आणि वाºयामुळे मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मारुती स्वीफ्ट व टाटा इंडिका या गाड्यांवर झाडे पडली. यात सहा जण किरकोळ जखमी झाले. लेडीज क्लब येथील पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ मारुती स्वीफ्ट गाडीवर मोठे झाड पडले. यात कारमधील दोघे व बाजूला उभे असलेले दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. गाडीचे मोठे नुकसान झाले.शहराच्या काही भागात जोराचा पाऊस झाला. परंतु विमानतळावरील हवामान विभागाच्या कार्यालयाने सायंकाळ ५.३० पर्यंत नागपूर शहरात ९.४ मि.मी. पाऊ स पडल्याची नोंद केली आहे.सोमवारी रात्री चांगला पाऊ स झाला. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारी शहराच्या अनेक भागात जोराचा पाऊ स झाल्याने झाडे पडली. रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी पडलेली झाडे हटविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांना चांगलीच कसरत करावी लागली. काटोल मार्गावरील पोलीस लाईन टाकळी, कस्तूरचंद पार्कजवळील संविधान चौक, रविनगर बसस्थानकाजवळ व बाजीप्रभू नगर आदी ठिकाणी झाडे पडली.वनदेवीनगरात नाल्याची भिंत पडलीवनदेवीनगर भागात जोराचा पाऊ स झाला. पूर आल्याने नाल्याची संरक्षक भिंत पडली. यामुळे आजूबाजूच्या घरात पाणी शिरले. अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली. परंतु काही वेळाने पावसाने उसंत घेतली. पूर ओसरल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.पावसामुळे शहरातील खोलगट भागात पाणी साचल्याची माहिती आहे. सर्वाधिक फटका उत्तर व पूर्व नागपुरातील वस्त्यांना बसला. उत्तर नागपुरात ठिकठिकाणी फूट-दीड फूट पाणी साचले होते. परंतु अधिकारी व पदाधिकारी या भागात फिरकले नाही. शेंडेनगर, रमानीनगर, कपिलनगर, मानवनगर, मैत्री कॉलनी, कामगारनगर, गुरू तेज बहादूर सिंग नगर, कल्पनानगर, समर्थनगर आदी वस्त्यांत पाणी साचल्याची माहिती आहे. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, आयबीएम रोड गिट्टीखदान चौकाजवळील घरात पाणी शिरले होते. बोरनाला वस्ती व जरीपटका वैभव अपार्टमेंटसमोर पाणी साचले होेते. शहरालगतच्या भागातही पाणी तुंबल्याच्या तक्रारी आहेत.