काटाेल : माजी सैनिक संघटनेच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त साेमवारी (दि. २६) काटाेल शहरातील शहीद स्मारक येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, नगरपालिकेचे उपाध्यक्ष सुभाष कोठे, ठाणेदार महादेव आचरेकर, पाेलीस उपनिरीक्षक पूनम कोरडे, कॅप्टन तेजसिंग जगदाळे, पंचायत समिती सदस्य प्रकाश अतकरणे, नगरसेवक जितेंद्र तुपकर, ॲड. दीपक केणे, अशोक काकडे, पुरुषोत्तम जोगेकर, कार्याध्यक्ष मधुकर काळबांडे, उपाध्यक्ष अशोक राऊत, सचिव अशोक मोहोड उपस्थित होते. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर ठाकरे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयाेजनाचा हेतू स्पष्ट केला. एनसीसी कॅडेटसने परेट सादर केली. रूपेश ताकतोडे यांच्या बँड पथकाने देशभक्तीपर गीते सादर केली. सूत्रसंचालन गणेश जोगेकर यांनी केले. कार्यक्रमाला अनिल भिंगारे, शंकरराव तभाने, अशोक शेंडे, अहमद पठाण, गुलाब भालसागर, प्रशांत केवटे, मेजर बोरकुटे, प्रवीण मुरोडिया, सुरेश महल्ले, चांगदेव ईखार, विजय डांगोरे, जयंत चाफले, सुरेश महल्ले, सुरेश दोडके यांच्यासह नागरिक व माजी सैनिक उपस्थित हाेते.