भिवापूर : पुलवामा हल्ल्यात भारतीय जवानांना वीरमरण पत्करावे लागले. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त भिवापूर शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने रविवारी दुपारी कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक देवनाथ निनावे, खुशाल हुडकन उपस्थित होते. भारतमातेच्या प्रतिमेची पूजा व मालार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अतिथींनी भारतीय सेनेचा इतिहास सांगून अशा प्रकारच्या हल्ल्यांना भारतीय जवानांनी आजवर कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले याबाबत मार्गदर्शन केले. शिवाय, अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने कार्यक्रमस्थळी १०१ दीप प्रज्वलित करण्यात आले हाेते. कार्यक्रमाला सागर रोकडे, प्रशांत इनकने, प्रदीप मेश्राम, मनोज वाढई, तुषार चिचमलकर, नागेश वाघमारे, सुयश हटवार, अमोल वारजुरकर, अंकित भोगे, कैलास लुचे, मृणाल पांडे, मीनाक्षी भोगे, शुभांगी नान्हे यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते.