लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मशानघाटावर सुरू झालेल्या क्षुल्लक वादातून दोन कुटुंबाने एकमेकांवर हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत घडली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.रामदुलारे यादव (५८) आणि त्यांचे पुतणे अनिल यादव (३०) हे हुडकेश्वर येथील धनगवळी नगरात राहतात. पोलीस सूत्रानुसार त्यांच्यामध्ये एक महिन्यापूर्वी वाद झाला होता. एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी ते स्मशानघाटावर गेले होते. तिथे दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. एकमेकांना पाहून ते ताणे मारू लागले. नंतर ही गोष्ट धमकीपर्यंत आली. बुधवारी रात्री ८ वाजता दोन्ही कुटुंब एकमेकांसमोर आले. अनिल यादवने सात-आठ साथीदाराच्या मदतीने काका रामदुलारे यांच्या घरावर हल्ला केला. चाकू आणि सळाखी हातात घेऊन अनिल व त्याचे साथीदार रामदुलारेच्या घरात गुसले. त्यांनी रामदुलारेवर शिविगाळ करीत हल्ला केला. घरात असलेल्या रामदुलारे यांच्या सुनेवर चाकूने हल्ला करून जखमी केले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी रामदुलारे यादवने मुलगा विनोद आणि अवधेशचा मदतीने अनिलच्या घरावर हल्ला केला. काठीने मारहाण करून जखमी केले. यानंतर दोन्ही गटातील लोक हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी अनिल आणि त्याचे साथीदाराविरुद्ध दंगा, मारहाण, हल्ला केल्याचा तर रामदुलारे व त्यांच्या मुलाविरुद्ध मारहाण व हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरात क्षुल्लक वादातून काका-पुतण्याचा एकमेकांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:59 PM
स्मशानघाटावर सुरू झालेल्या क्षुल्लक वादातून दोन कुटुंबाने एकमेकांवर हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत घडली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देस्मशानघाटावर सुरू झालेल्या क्षुल्लक वादातून घटना