नागपूर : ही बाब लक्षात घेऊन ‘एमएसबीटीई’ने २७ मार्च रोजी परिपत्रक जारी केले. त्यानुसार ३० व ३१ मार्च रोजी अशा विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ अर्ज साहजिकच विद्यार्थी अर्ज भरण्याच्या तयारीला लागले होते. परंतु या अर्जासोबत विद्यार्थ्यांना जे हमीपत्र भरून द्यायचे होते, त्यातील दोन अटींमुळे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरण्याचे टाळले आहे. हमीपत्रातील अट क्र.३ व अट क्र.४ मधील मुद्दे हे विद्यार्थ्यांच्या मनोबलावरच परिणाम करणारे होते. विलंबाने परीक्षा अर्ज भरल्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन थिअरी परीक्षा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे यातील कुठलीही एक परीक्षा देणे बंधनकारक असल्याचे विद्यार्थ्यांना मुद्दा क्र.३ नुसार लिहून द्यायचे होते. तर अट क्र.४ नुसार तर प्रश्नपत्रिका कमी पडल्या तर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येऊनदेखील परीक्षा देता येणार नाही. यामुळे मागील परीक्षांचे विषय बाकी असलेल्या विद्यार्थ्यांसमोर यामुळे मोठा पेच निर्माण झाला व यातूनच अनेकांनी अर्ज भरले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.विलंब शुल्कातदेखील वाढ१५ मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी १५०० रुपये विलंब शुल्क घेण्यात येत होते. परंतु ‘एमएसबीटीई’ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ३० व ३१ मार्च रोजी चार हजार रुपये दंडासह विद्यार्थ्यांना हे अर्ज भरण्याची संधी देण्यात आली होती. ‘पॉलिटेक्निक’च्या अभ्यासक्रमांत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे केवळ परीक्षेसाठी चार हजार रुपये विलंब शुल्क भरणे अनेकांना शक्य झाले नाही. ‘एमएसबीटीई’ने विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा होता अशी संतप्त भावना विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.विद्यार्थ्यांना शिक्षा का?महाविद्यालयांनीदेखील या अटींबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. अशा अटींमुळे परीक्षा देण्याअगोदरच विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण निर्माण झाला आहे. शिवाय विद्यार्थ्यांकडून जर शुल्क घेण्यात येत आहे तर त्यांना प्रश्नपत्रिका पुरवणे ही ‘एमएसबीटीई‘ची जबाबदारी आहे. जर त्या कमी पडल्या तर विद्यार्थ्यांना त्याची शिक्षा का असा सवाल ‘पॉलिटेक्निक’ संस्थाचालकांनी नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केले. यासंदर्भात ‘एमएसबीटीई’चे सचिव डॉ.विनोद मोहितकर यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला. परंतु ते बैठकीत व्यस्त असल्याचे कारण देण्यात आले.
दोन अटींमुळे विद्यार्थी अडचणीत
By admin | Published: April 01, 2015 2:21 AM