नागपूर : सफाई कंत्राटदाराकडून एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी कन्हान नगर परिषदेचे उपाध्यक्ष आणि भाजपाचे स्थानिक नेते डॉ. मनोहर पाठक यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. कोर्टाच्या आदेशामुळे झालेल्या या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. कन्हान शहरातील घनकचरा उचलणे आणि साफसफाई करण्याचे कंत्राट २०१५ मध्ये खलीद अन्सारी यांना मिळाले होते. त्यांचे थकीत बिल काढून देण्याच्या बदल्यात नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. पाठक यांनी एक लाखाची लाच मागितल्याची तक्रार अन्सारी यांनी गेल्यावर्षी एसीबीकडे नोंदवली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी आपल्या अधिकाऱ्यांमार्फत सापळा रचून ९ आॅक्टोबर २०१५ ला सायंकाळी कन्हानच्या जयस्तंभ चौकात लाचेची रक्कम स्वीकारताना डॉ. पाठक यांना पकडले होते. या कारवाईदरम्यान जयस्तंभ चौकात एका महिला अधिकाऱ्यांसोबत काही जणांनी धक्काबुक्कीही केली होती. (प्रतिनिधी)
उपाध्यक्ष अडचणीत
By admin | Published: July 27, 2016 2:45 AM