शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

ट्रकने विद्यार्थिनीला चिरडले

By admin | Published: February 09, 2017 2:54 AM

सदर पोलीस ठाण्यासमोर एका अनियंत्रित ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चिरडले.

एफसीआय आयुक्तांच्या मुलीचा मृत्यू : मित्रही गंभीर जखमी नागपूर : सदर पोलीस ठाण्यासमोर एका अनियंत्रित ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चिरडले. या अपघातात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा वर्गमित्र जखमी झाला. या अपघाताने सदर पोलीस ठाणेही हादरले. अपर्णा राजू अंभोरे (१७) रा. जयहिंद नगर मानकापूर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती हिस्लॉप कॉलेजमध्ये अकरावीला शिकत होती. ती आपल्या सहकारी मित्रासोबत बुधवारी दुपारी ३.३० वाजता अ‍ॅक्टीव्हाने घराकडे जात होती. अ‍ॅक्टीव्हा अपर्णाचा वर्गमित्र चालवित होता. सदर पोलीस ठाण्यासमोर आयशर ट्रकने (एम.एच./४०/एन/४३१०) च्या चालकाने अ‍ॅक्टीव्हाला मागून धडक दिली. या धडकेमुळे दोघेही अ‍ॅक्टीव्हासह खाली पडले. अपर्णा ट्रकच्या समोर तर तिचा मित्र विरुद्ध दिशेने पडला. अपर्णा ट्रकमध्ये सापडल्याने ती गंभीर जखमी झाली. ठाण्यासमोरच अपघात झाल्याने पोलीस कर्मचारीही मदतीसाठी धावले. त्यांनी अपर्णाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. तिचा मित्रही जखमी झाला. तो हा अपघात पाहून घाबरून गेला. अपर्णाचे वडील भारतीय खाद्य महामंडळात आयुक्त आहेत. ते मुंबईत कार्यरत आहेत. अपर्णाच्या कुटुंबात आई जया, मोठी बहीण मनीषा आणि लहान भाऊ अभिषेक आहेत. जया गृहिणी आहे. मनीषा बारावीची विद्यार्थिनी आहे. या घटनेमुळे अंभोरे कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. अपर्णा ही हुशार विद्यार्थिनी होती. घटनेच्यावेळी ती वर्गमित्रासोबत घरी परतत होती. प्रत्यक्षदर्शीनुसार अ‍ॅक्टीव्हाची गती सामान्य होती तर ट्रक भरधाव वेगाने होता. ट्रक चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवीत अपर्णाला चिरडले. सदर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून ट्रक चालक संतोष बकाराम राऊत (२१) वडधामना याला अटक केली आहे.(प्रतिनिधी) जीवाशी खेळताहेत चालक जड वाहन चालविणारे वाहन चालक नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. लोकमतने काही दिवसांपूर्वीच नवशिके चालक जड वाहन चालवीत असल्याचा खुलासा केला होता. सहा महिने किंवा एक वर्षाच्या अनुभवानंतरच जड वाहन चालवण्यासाठी दिले जातात. कमी पगारात अधिक काम घेण्यासाठी वाहन मालक असे करतात. अशा परिस्थितीत त्यांच्या हातून अपघात होतात. अपर्णाला चिरडणारा चालकही नवशिक्या होता.