लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : ट्रकमधील साेयाबीन खाद्यतेलाचे १६० डबे चाेरीला गेल्याने तसेच ट्रान्सपाेर्टरने तक्रार दाखल केल्याने पाेलिसांनी ट्रकचालकास चाैकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, त्या ट्रकचालकाने बदनामीच्या भीतीपाेटी ट्रकच्या केबिनला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्यासमाेर साेमवारी (दि. १४) मध्यरात्री घडली.
अशोक जितूलाल नागोत्रा (२५, रा. शेंडेनगर, कामठी) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. ताे एमएच-०४/जीआर-२७७४ क्रमांकाच्या ट्रकवर चालक म्हणून काम करायला. ताे बुधवारी (दि. ९) रात्री साेयाबीन तेलाचे १,७०० डबे (प्रत्येकी १६ किलाे) घेऊन नागपूरहून भिवंडीच्या दिशेने एकटाच निघाला. त्या मध्यरात्री त्याने बाजारगाव परिसरातील पेट्राेल पंपजवळ ट्रक थांबवून मुक्काम केला. ताे ट्रकच्या केबिनमध्ये झाेपला असताना ट्रकमधील तेलाचे डबे चाेरीला गेल्याचे गुरुवारी (दि. १०) सकाळी उघड झाल्याने ट्रान्सपाेर्ट व्यावसायिक राजेंद्र रामभगतसिंह चव्हाण (४४, रा. नेताजीनगर, नागपूर) यांनी साेमवारी (दि. १४) काेंढाळी पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. तेलाचे डबे अशाेकच्या ताब्यातून चाेरीला गेल्याचेही राजेंद्र चव्हाण यांनी पाेलीस तक्रारीत नमूद केले हाेते. त्या तेलाची एकूण किंमत ३ लाख ६८ हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले.
त्याअनुषंगाने पाेलिसांनी भादंवि ४०६ अन्वये गुन्हा नाेंदवून ट्रकचालक अशाेकला साेमवारी चाैकशीसाठी ताब्यात घेतले. शिवाय, ट्रक पाेलीस ठाण्याच्या सुरक्षा भिंतीबाहेर उभा हाेता. त्या ट्रकमधील तेलाच्या डब्यांचे माेजमाप करावयाचे हाेते. अशाेक रात्री याच ट्रकच्या केबिनमध्ये झाेपी गेला. दरम्यान, मंगळवारी सकाळी ताे ट्रकच्या केबिनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने ताराच्या मदतीने गळफास लावला हाेता. या प्रकाराची माहिती मिळताच पाेलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पाेलीस अधीक्षक राहुल माकनीकर, उपअधीक्षक संजय पुरंदरे, उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव, काटाेलचे ठाणेदार महादेव आचरेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
...
न्यायाधीशांसमक्ष पंचनामा
या घटनेच्या तपासात पारदर्शकता यावी म्हणून पाेलिसांनी काटाेल येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नीलिमा पेठे यांच्या समक्ष पंचनामा केला. यावेळी शासकीय पंच म्हणून तहसीलदार अजय चरडे, तलाठी नीलेश कदम, गिरीश काेहळे व राकेश पिंपळकर उपस्थित हाेते. शिवाय, मृत अशाेकची पत्नी, मुलं व भाऊ हजार हाेता. त्याच्या खिशात ५,६४६ रुपये व काही कागदपत्रे आढळून आली.
...
‘मै चाेर नही हू
अशाेकने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या डावा हात व पायावर निळ्या शाईच्या पेनाने ‘मै चाेर नही हू’ असे लिहिले हाेते. शिवाय, त्याच्या शरीरावर माराच्या खुणा अथवा जखमा अथवा कुठलेही संशयास्पद निशाण आढळून आले नाही. पाेलिसांनी त्याला आराेपीदेखील केले नसल्याने त्याला ताब्यात घेतले नव्हते.
...
चार दिवसानंतर तक्रार
ही घटना ९ जूनच्या मध्यरात्री घडली असून, १० जूूनला सकाळी उघडकीस आली. या प्रकरणात ट्रकमालकाने त्याच्या विराेधात तक्रार दाखल केली नव्हती. उलट, ट्रान्सपाेर्ट व्यावसायिकाने चार दिवसानी अर्थात साेमवारी (दि. १४) पाेलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे पाेलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात चाेरट्याने ट्रकचा मागचा जाे भाग सीसीटीव्हीमध्ये येत नाही, तिथून ताडपत्री कापून डबे काढले व छाेट्या मालवाहू वाहनाने ते चाेरून नेले.
===Photopath===
150621\img-20210615-wa0030.jpg
===Caption===
कोंढाळी पोलीस ठाण्यां समोर ट्रक चालकांची आत्महत्या.