शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

ट्रक चोरणारी आंतरराज्यीय टोळी नागपूर पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 11:52 PM

मध्य प्रदेश पोलिसांनी बक्षीस ठेवलेल्या आरोपीसह ट्रक चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या दोन सदस्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ट्रक चोरीच्या १३ प्रकरणांचा खुलासा करीत १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ठळक मुद्देबक्षीस असलेल्या आरोपीसह दोघे अटकेत : १३ प्रकरणे उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेश पोलिसांनी बक्षीस ठेवलेल्या आरोपीसह ट्रक चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या दोन सदस्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ट्रक चोरीच्या १३ प्रकरणांचा खुलासा करीत १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींमध्ये संतोष ऊर्फ कुबड्या मुलचंद अहिरवार (४६) सागर व कलिराम श्रीवास (४५) रा. परासिया, मध्य प्रदेश यांचा समावेश आहे.आरोपी बऱ्याच काळापासून मध्य प्रदेश व महाराष्ट्रात ट्रक चोरी करीत होते. संतोष १५ वर्षांपासून नंदनवन येथील हिवरीनगर येथे राहत होता. तो कलिराम याच्यासोबत ट्रक चोरी करीत होता. संतोष मास्टर चावीच्या माध्यमातून ट्रक अथवा अन्य वाहन चोरतो. कलिराम शहरात फिरून ट्रकवर नजर ठेवतो. संतोष ट्रक चोरून कलिराम याच्या स्वाधीन करीत होता. कलिराम त्याची मध्य प्रदेशात विक्री करीत होता. ट्रान्सपोर्टर अथवा कबाडी व्यावसायिक त्याचे खरेदीदार होते.कलिरामची मध्य प्रदेशात दहशत आहे. मध्य प्रदेश पोलीस त्याच्या शोधात आहे. सतलापूर पोलिसांनी त्याच्यावर पाच महिन्यापूर्वी पाच हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते, तरीही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. ४ डिसेंबरच्या रात्री पाचपावली ठाण्याच्या परिसरात राहणारे राजेंद्र धकाते यांची दुचाकी चोरीला गेली. याचा तपास करताना पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. गुन्हे शाखा पोलीस त्यांचा शोध घेत होती. पोलीस गस्त देत असताना दोघाही चोरीच्या ट्रकसोबत सापडले. चौकशी केल्यावर त्यांनी ट्रक मध्य प्रदेशच्या सतलापूर येथून चोरल्याचे कबूल केले. त्यांनी धकातेची दुचाकी चोरल्याचीही कबुली दिली. त्या आधारावर त्यांच्यावर पाचपावली पोलिसांनी त्यांना चोरीच्या प्रकरणात अटक केली. या दोघांनी मध्य प्रदेशात सात ट्रकांची चोरी केली आहे, तर शहरात वाहन चोरी, बॅटरी चोरीच्या १३ प्रकरणांचा खुलासा केला आहे. आरोपींना भोपाळ पोलीस ताब्यात घेणार आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत, एपीआय ज्ञानेश्वर भेदोडकर, एपीआय मंगला मोकासे, एएसआय राजेंद्र बघेल, हवालदार शत्रुघ्न कडू, शैलेश ठवरे, अनिल दुबे, सुरेश हिंगणेकर, श्याम कडू, अतुल दवंडे, फिरोज शेख तसेच शरीफ शेख यांच्याकडून करण्यात आली.ट्रान्सपोर्टर, कबाडी व्यावसायिकांशी संपर्कयापूर्वी २०१४ व २०१७ मध्ये नागपूर पोलिसांनी त्यांना पकडून मध्य प्रदेश पोलिसांना सोपविले होते. आरोपींकडून सक्तीने विचारणा केल्यावर त्यांच्याशी जुळलेल्या ट्रान्सपोर्टर व कबाडी व्यावसायिकाचे नाव पुढे येऊ शकतात. शहरातील काही ट्रान्सपोर्टर चोरीच्या वाहनांची हेराफेरी करण्यात लिप्त आहेत. कबाडी व्यावसायिकसुद्धा चोरीचे वाहन खरेदी करून मालामाल होत आहेत.

 

टॅग्स :theftचोरीArrestअटक