शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

नागपूर मेट्रोची गती ताशी ९० किमीपर्यंत वाढण्यावर प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 7:01 PM

एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ताशी ९० किमी वेगाने ट्रायल रन करण्यासाठी संशोधन डिझाईन व स्टँडर्ड आॅर्गनायझेशन अर्थात ‘आरडीएसओ’ने हालचाली सुरू केल्या आहेत. ‘आरडीएसओ’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही चाचणी घेण्यात येत असून उच्चस्तरीय पथकाने ताशी ९० किमी वेगाने ट्रायल रन करण्यासाठी तपासणीला सुरुवात केली आहे. सध्या ताशी २५ किमी वेगाने धावणारी मेट्रो ताशी ९० किमी वेगाने धावणार आहे.

ठळक मुद्दे ‘आरडीएसओ’ची पथकातर्फे चाचणी : अहवालाच्या आधारे पुढील रूपरेषा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ताशी ९० किमी वेगाने ट्रायल रन करण्यासाठी संशोधन डिझाईन व स्टँडर्ड आॅर्गनायझेशन अर्थात ‘आरडीएसओ’ने हालचाली सुरू केल्या आहेत. ‘आरडीएसओ’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही चाचणी घेण्यात येत असून उच्चस्तरीय पथकाने ताशी ९० किमी वेगाने ट्रायल रन करण्यासाठी तपासणीला सुरुवात केली आहे. सध्या ताशी २५ किमी वेगाने धावणारी मेट्रो ताशी ९० किमी वेगाने धावणार आहे.विविध मानकाअंतर्गत ‘आरडीएसओ’ चाचणी करण्यात येत आहे. उपसंचालक एस.एस. परवान यांच्या नेतृत्वातील पथकात सहा अभियंते आणि पाच तंत्रज्ञ अशा एकूण १२ सदस्यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी गाडीच्या विविध भागात सेन्सर्स बसवले असून याद्वारे मिळणारी माहिती संकलित केली जाते. ‘आॅसिलेशन ट्रायल’ ९० किमी सोबतच ५० किमी, ६५ किमी आणि ८० किमी ताशी वेगानेदेखील केली जात आहेत.या अंतर्गत प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, रायडरशिप इंडेक्स, आपत्कालीन ब्रेक व्यवस्था यासारख्या मानकांचीदेखील चाचणी करण्यात येत आहे. या सर्व मानकाअंतर्गत होणारी चाचणी सामान्य तसेच पावसाळी वातावरण निर्माण करून केली जाते. गाडीत एकही प्रवासी नसताना किंवा गाडी प्रवाशांनी पूर्ण भरली असतांनादेखील मानकांचे परीक्षण ‘आरडीएसओ’ करीत आहेत. याप्रमाणे मिळालेल्या सर्व माहितीचे संकलन करून अहवाल तयार केला जाईल. या अहवालाचा सखोल अभ्यास करत पुढील रूपरेषा आखली जाईल.यापूर्वी १२ आॅक्टोबरला ‘आरडीएसओ’च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट देत ताशी ९० किमी गतीने गाडी चालविण्याकरिता होत असलेल्या तयारीचा आढावा घेतला होता. त्या पथकाने तयारीवर समाधान दर्शविल्यानंतर आता या चाचण्या घेण्यात येत आहेत.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर